प्रभाग समित्यांवर भाजपची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:49 AM2019-04-11T00:49:21+5:302019-04-11T00:49:24+5:30

भाजपकडे ९, शिवसेनेकडे ८ प्रभाग समित्या

BJP's ruling on ward committees | प्रभाग समित्यांवर भाजपची सत्ता

प्रभाग समित्यांवर भाजपची सत्ता

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीत युती झाल्यानंतरही महापालिकेतील वैधानिक समित्यांपासून दूर राहणाऱ्या भाजपला अखेर सत्तेचा मोह आवरला नाही. म्हणूनच यंदाही प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व असणार आहे. तर शिवसेनेला सात प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले आहे. विरोधकांच्या हातून प्रभाग समित्याही निसटल्या आहेत.


पालिका निवडणूक स्वबळावर लढवून ८३गरसेवक निवडून आणणाऱ्या भाजपचे सत्तेच स्वप्न मात्र भंग झाले. परंतु संख्याबळ वाढल्यामुळे प्रभाग समित्यांवर पाणी सोडण्यास भाजप नगरसेवक राजी नाहीत. त्यामुळे १७ प्रभाग समित्यांपैकी सोमवारी पार पडलेल्या आठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदांच्या निवडणुकीत पाच प्रभाग समित्या भाजपकडे तर तीन प्रभाग समित्या शिवसेनेकडे गेल्या. तर मंगळवारी उर्वरित आठ प्रभागांच्या निवडणुकीत भाजपकडे आणखी चार समित्यांची अध्यक्षपदे आली.


शिवसेना -भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने विरोधकांची ताकद संपली आहे. त्यामुळे बहुतांशी प्रभाग समित्यांमध्ये विरोधी पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे शिवसेना - भाजपचे संबंधित प्रभागातीस उमेदवार बिनविरोध निवडून आले. मात्र ‘एम/पूर्व’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवार वैशाली शेवाळे या सात मते मिळवून निवडून आल्या. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाच्या उमेदवार रुक्साना नाझीम सिद्दिकी यांना चार मते मिळाली.

स्वपक्षीयांनीच
केला घात...

एम पूर्व प्रभागात एम.आय.एम.चा एक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक, समाजवादी पक्षाचा एक असे तीन सदस्य अनुपस्थित होते. तर काँग्रेसचा एक सदस्य तटस्थ राहिला. एकूण १५ सदस्यांपैकी १२ सदस्य उपस्थित होते. शिवसेनेच्या उमेदवार वैशाली शेवाळे यांना तीन मते अधिक मिळाल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

Web Title: BJP's ruling on ward committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.