हिंदू चेतना संगम उपक्रमासाठी भाजपचे एकत्रिकरण : ७ जानेवारी रोजी देशभर कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 18:46 IST2017-11-25T18:40:59+5:302017-11-25T18:46:09+5:30

७ जानेवारी रोजी देशभर होणा-या हिंदू चेतना संगम उपक्रमाची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिका-यांना व्हावी यासाठी शुक्रवारी संध्याकाळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व रा.स्व.संघाचे विठ्ठल भट यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

BJP's gathering for Hindu Consciousness Sangam initiative: On January 7, the program will be organized all over the country | हिंदू चेतना संगम उपक्रमासाठी भाजपचे एकत्रिकरण : ७ जानेवारी रोजी देशभर कार्यक्रम

हिंदू चेतना संगम उपक्रमासाठी भाजपचे एकत्रिकरण

ठळक मुद्दे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले मार्गदर्शनब्राह्मण सभेमध्ये एकत्रिकरण संपन्न

डोंबिवली: ७ जानेवारी रोजी देशभर होणा-या हिंदू चेतना संगम उपक्रमाची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिका-यांना व्हावी यासाठी शुक्रवारी संध्याकाळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व रा.स्व.संघाचे विठ्ठल भट यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
येथिल ब्राह्मण सभेमध्ये हे एकत्रिकरण संपन्न झाले. त्यात चव्हाण यांनी संघाने केलेल्या आवाहनानूसार परिवारातील सर्व संघटना, स्वयंसेवकांनी त्या उपक्रमात सहभागी व्हावे. शहरातील प्रत्येक नागरिकाला त्या उपक्रमाशी जोडुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. तसेच संघाने आवाहन केल्याप्रमाणे जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी गणवेश पूर्ती करावे असे आवाहन करण्यात आले. ७ जानेवारी रविवारी होणा-या विविध उपक्रमांसंदर्भात माहिती देण्यात आली.
त्यावेळी भाजपच्या स्थायी समितीचे नगरसेवक संदीप पुराणिक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, शिवाजी आव्हाड, नंदू परब, पूर्वमंडल अध्यक्ष संजीव बिडवाडकर, रवी ठक्कर, आदींसह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: BJP's gathering for Hindu Consciousness Sangam initiative: On January 7, the program will be organized all over the country