Birthday Special : जाणून घ्या प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्याविषयीच्या खास गोष्टी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 03:06 PM2017-12-28T15:06:06+5:302017-12-28T15:26:09+5:30

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा आज 80 वा वाढदिवस आहे.

Birthday Special: Know about the famous businessman Ratan Tata | Birthday Special : जाणून घ्या प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्याविषयीच्या खास गोष्टी 

Birthday Special : जाणून घ्या प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्याविषयीच्या खास गोष्टी 

Next

मुंबई - देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. रतन टाटा हे टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेद जी टाटा यांचे दत्तक घेतलेले नातू आहेत. 1991मध्ये त्यांचे काका जेआरडी टाटा यांनी रतन टाटा यांना आपला उत्तराधिकारी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रतन टाटा यांनी चांगल्या पद्धतीनं कंपनीची कमान सांभाळली आणि देशाची  अर्थव्यवस्था सुधारणेसंबंधी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. 

जाणून घेऊया रतन टाटांबाबतच्या काही गोष्टी
1. टाटा ग्रुपमध्ये 100 हून अधिक कंपन्यांचा समावेश आहे. टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये सुईपासून ते विमानांपर्यत सर्व बाबींची निर्मिती केली जाते. 

2. रतन टाटा यांनी सुरुवातीला IBM ची नोकर नाकारली. त्यानंतर एका कर्मचा-याच्या स्वरुपात 1961 मध्ये TATA Steel मध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 1991मध्ये ते टाटा ग्रुपचे अध्यक्ष बनले. 2013 मध्ये रतन टाटा निवृत्त झाले. 

3. 2000 मध्ये रतन टाटा यांना पद्म भूषण आणि 2008मध्ये पद्म विभूषण या सर्वोच्च नागरिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते.  
4.  मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताज हॉटेलमध्ये जेवढी माणसं जखमी झाले होते त्यांच्यावर टाटा ग्रुपनं उपचार केले होते. शिवाय, काही दिवसांसाठी हॉटेलदेखील बंद ठेवण्यात आले होते. 26/11 नंतर एवढ्या अडचणी आल्या तरीही कर्मचा-यांचा पगार थांबवण्यात आला नाही.

5. 2009 मध्ये रतन टाटा यांनी 9600 कोटी रुपयांची जॅग्वार लॅण्डरोवर ही महागडी कार खरेदी केली होती. 

6. रतन टाटा यांना चार वेळा प्रेम झालं, मात्र त्यांनी लग्न केले नाही. रतन टाटा अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेले असताना यादरम्यान एका तरुणीच्या प्रेमात होते. दोघं लग्नदेखील करणार होते. यादरम्यान रतन टाटा यांच्या आजीची प्रकृती बिघडल्यानंते भारतात आले. मात्र भारत-चीन युद्धामुळे त्यांची प्रेयसी खूपच भयभयीत झाली व काही दिवसांनंतर त्यांच्या प्रेयसीनं अमेरिकेमध्येच दुस-या व्यक्तीसोबत विवाह केले .

7. रतन टाटा यांना विमान उडवणे व पियानो वाजवण्याचा छंद आहे. 

 

Web Title: Birthday Special: Know about the famous businessman Ratan Tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.