'जरांगेंमुळे मराठा तरुणांचं नुकसान, राजकीय लोकांच्या भल्यासाठी आरक्षण; विजय वड्डेटीवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:21 PM2023-11-10T12:21:34+5:302023-11-10T12:25:24+5:30

विजय वड्डेटीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले.

Big loss of Maratha youth due to Jarangs, reservation for the good of political people; Vijay Vaddetiwar's allegation | 'जरांगेंमुळे मराठा तरुणांचं नुकसान, राजकीय लोकांच्या भल्यासाठी आरक्षण; विजय वड्डेटीवार यांचा आरोप

'जरांगेंमुळे मराठा तरुणांचं नुकसान, राजकीय लोकांच्या भल्यासाठी आरक्षण; विजय वड्डेटीवार यांचा आरोप

मुंबई-  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला असून दुसरीकडे आता ओबीसी आरक्षणावरुन ओबीसी नेत्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे, मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. आता विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवर यांनीही विरोध केला असून त्यांनी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. 

अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली; चर्चांना उधाण

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा तरुणांचं मोठं नुकसान होणार आहे. अगोदर तरुणांनी आरक्षणाचा अभ्यास केला पाहिजे. ओबीसीत ३७२ जाती आहे, यात येऊन फायदा होणार नाही. जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सर्व काही ठरवू नये, अभ्यास करुन तरुणांनी निर्णय घ्यावा, असं आवाहन वड्डेटीवार यांनी केलं.

' ज्या ठिकाणी नोकऱ्यांचा आणि सोयी, सवलती यांचा संदर्भ येतो तिथे मोठं नुकसान होणार आहे. अशा परिस्थीतीत मराठा तरुणांनी अभ्यास करुन आपण कोणाला साथ देत आहोत. आपलं भलं काय आहे याचा विचार करावा, असा सल्लाही वड्डेटीवार यांनी दिला. आंदोलनात गोळीबीर झाल्यानंतर ते नायक म्हणून पुढे आले. समाजाचा पाठिंबा मिळाल्यामुळे  ते आता सरकारला वाकवू शकतो असं म्हणत आहेत. धमक्यांनी प्रश्न सुटणार आहे का? कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण द्यावं लागतं, असंही विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले. 

Web Title: Big loss of Maratha youth due to Jarangs, reservation for the good of political people; Vijay Vaddetiwar's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.