भीमा-कोरेगाव प्रकरण : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी कायम !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 02:51 PM2018-01-04T14:51:36+5:302018-01-04T15:11:06+5:30

पुण्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेप्रकरणी हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अटकेची मागणी उचलून धरली आहे.

Bhima-Koregaon case: Demand for arrest of Sambhaji Bhide and Milind Ekbote! | भीमा-कोरेगाव प्रकरण : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी कायम !

भीमा-कोरेगाव प्रकरण : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी कायम !

Next
ठळक मुद्देसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी कायम !दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी सरकारनं दिलेल्या आश्वासनांची लवकर पूर्तता करावी

मुंबई : पुण्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेप्रकरणी हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अटकेची मागणी उचलून धरली आहे.
कोरेगाव भीमा घटनेप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, सरकारकडून आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारने दिलेल्या आश्वासनांची लवकर पूर्तता करावी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ते म्हणाले, दलित तरुणांचा धरपड तातडीने थांबवावी, तसेच कोम्बिंग ऑफरेशन थांबविण्याची विनंती सरकारकडे करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा घटनेच्याविरोधात झालेले आंदोलन फक्त दलित समुदायांचे आंदोलन नाही, तर यामध्ये इतर समाज घटकांचाही सहभाग होता. 
याचबरोबर, सध्याच्या परिस्थितीत छात्र भारतीने मुंबईतमधील पार्ल्यातील गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी नेते उमर खालिद यांचा कार्यक्रम घेऊ नये अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हा कार्यक्रम सध्याची परिस्थिती नियंत्रणात आली की कधीही करु शकता असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. यासाठी त्यांनी आदल्या दिवशी कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. ही माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या शिष्टमंडळाला दिली. दरम्यान, कपिल पाटील यांनी स्वतःहून कार्यक्रम पुढे ढकलायला पाहिजे होता, असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. 

जिग्नेश मेवाणी आणि उमर खलिद यांच्याविरोधात मुंबईत सर्च वॉरंट 
गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्याविरोधात मुंबईतील जूहू पोलिसांनी सर्च वॉरंट जारी केल्याचे वृत्त आहे. आज छात्र भारतीच्या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. विलेपार्ल्याच्या भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. 

महाराष्ट्र बंदला हिंसक वळण
कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी महाराष्ट्रभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट लागले. जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी व बसचे चालक गंभीर जखमी झाले, तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे शीघ्रकृती दलाच्या जवानांनी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

Web Title: Bhima-Koregaon case: Demand for arrest of Sambhaji Bhide and Milind Ekbote!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.