BEST Strike Live : चर्चा निष्फळ; बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 08:52 AM2019-01-10T08:52:24+5:302019-01-10T22:11:58+5:30

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा तिसरा दिवस आहे.  बेस्ट  प्रशासनाने मेस्मांतर्गत कारवाई तसेच कामगार वसाहती खाली करण्यास सुरुवात ...

BEST Strike Live : चर्चा निष्फळ; बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार | BEST Strike Live : चर्चा निष्फळ; बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार

BEST Strike Live : चर्चा निष्फळ; बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार

Next
ठळक मुद्देबेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवसतीनशे कामगारांना मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस सर्वसामान्य मुंबईकर वेठीस

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. बेस्ट प्रशासनाने मेस्मांतर्गत कारवाई तसेच कामगार वसाहती खाली करण्यास सुरुवात केली आहे. कामगार संघटना ठाम राहिल्यामुळे संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. परिणामी, मुंबईकरांचे सलग तिसऱ्या दिवशीही हाल सुरू आहेत. कारवाईमुळे बेस्ट कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहे. बेस्ट उपक्रम ही अत्यावश्यक सेवा असल्याने प्रशासनाने औद्योगिक न्यायालयातून संपावर बंदी आणून हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुळे तीनशे कामगारांवर मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस तसेच भोईवाडा, परळ, वडाळा, कैलास पर्वत येथील बेस्ट वसाहतीतील दोन हजार कामगारांकडून घरे खाली करून घेण्यास सुरुवात झाली. या कारवाईला कामगारांनी विरोध केल्याने संप चिघळला आहे. 

वेतन करार, बोनस, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण या मुद्द्यांवर बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीने सोमवारी (7 जानेवारी) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. 

या मागण्यांसाठी संप
1. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे 2016-2017, 2017-2018 या काळातील सानुग्रह अनुदान मिळणे
2.एप्रिल 2016पासून लागू होणाऱ्या वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी
3. अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती
4. बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावावर अंमल
5. कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवणे

दुसरीकडे, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला दिलेला नैतिक पाठिंबा शिवसेनेनं मंगळवारी काढून घेतला. संपात फूट पडल्याचीही कबुलीही शिवसेनेकडून देण्यात आली. शिवसेनेने ऐनवेळेस संपातून माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या संघटनेतील काही पदाधिका-यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.  

बेस्टचे सहा कोटींचे नुकसान

बेस्ट उपक्रमाला दररोज प्रवासी भाड्यातून तीन कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र गेल्या दोन दिवसांत एकही बस आगाराबाहेर न पडल्यामुळे बेस्ट उपक्रमाचा दोन दिवसांचा महसूल बुडाला. बुधवारी (9 जानेवारी) वडाळा, वरळी, वांद्रे आगारातील ११ बसगाड्या सकाळी बस आगाराबाहेर पडल्या. मात्र या बसगाड्याही काही तासांनी बस आगारांमध्ये परतल्या.
 

LIVE

Get Latest Updates

10:26 PM

उद्धव ठाकरे यांच्यासोबतची 7 तास चाललेली बैठक निष्फळ

बेस्ट कर्मचारी संपावरील तोडग्यासाठी सुरु असलेली मॅरेथॉन बैठक अखेर रात्री 10 वाजता संपली असून उद्धव ठाकरे, महापौरांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याचे कामगार संघटनेचे प्रशांत राव यांनी सांगितले. 

08:51 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीवेळी शिवसेनेच्या संघटनेला लांब ठेवले. 

ताळमेळ नसल्याने संपातून माघार घेतल्याचे केलेले जाहीर. मात्र, संघटनेतील सदस्य कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने शिवसेना पडली तोंडघशी.

उद्धव ठाकरे यांना रात्री उशिरा कल्पना दिल्याने नाराजी.

07:14 PM

महापौर बंगल्यावर तीन तासांपासून चर्चा सुरु

  • बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यावर तीन तासांपासून चर्चा सुरु
  • संपाविरोधात उद्या उच्च न्यायालयात सुनावणी
  • अद्याप कुठलाही तोडगा नाही
  • शशांक राव यांच्यासह राणे समर्थक चव्हाण हे देखील उपस्थित.
     

06:58 PM

मुंबई मनपाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा बेस्ट संपाला पाठिंबा; मागण्या मान्य न झाल्यास संपात सहभागी होणार

05:30 PM

  • बेस्ट संपावर तोडग्यासाठी थोड्याच वेळात महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि कामगार संघटनेचे सचिव शशांक राव यांच्यात बैठक.
  • बेस्ट कामगार संयुक्त समिती महापौर बंगल्यावर राहणार उपस्थित.

05:10 PM

बेस्ट कर्मचाऱ्यांना रस्त्यावर येऊ देणार नाही; नारायण राणे यांचा इशारा

बेस्टच्या संपाला शिवसेनाच जबाबदार असून पुन्हा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला घर खाली करण्याची नोटीस दिल्यास आपण स्वत: तेथे जाणार असल्याचा इशारा नारायण राणे यांनी दिला. 

शिवसेना-भाजप सत्तेला हपापलेले आहेत. यामुळे ते लोकसभा, विधानसभेसाठी 100 टक्के एकत्र येणार असा दावाही नारायण राणे यांनी केला.

04:43 PM

मंत्रालयात सचिवांसोबत बेस्टच्या महासंचालकांची बैठक सुरुच

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संपावर तोडगा निघेना

 

03:29 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापौर बंगल्यावर दाखल

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापौर बंगल्यावर दाखल

01:48 PM

- मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनीही बोलावली बैठक 
- तोडगा काढण्यासाठी आता मंत्रालयातून हालचाली सुरू
- महापौर बंगल्यावर दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे बैठक घेणार

01:43 PM

- कृती समितीच्या बैठकीमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी वडाळा आगारासमोरील आंदोलन मागे, पोलिसांकडून जमावाला पांगवण्यास सुरुवात 
- बेस्ट कर्मचारी मात्र गटागटाने आगारासमोरील मार्गावर ठाण देऊन उभे आहेत
 

01:42 PM

बेस्ट कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार नितेश राणे वडाळा आगारसमोर दाखल

नितेश राणेंच्या भाषणातील मुद्दे 
- चर्चेची नाटक सुरू आहेत
- वेळकाढू का करत आहात? हा सवाल व्यवस्थापकांना विचारणार आहे
- मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही
- २०१७ला झालेल्या संपावेळी दिलेली आश्वासन अद्याप पूर्ण नाही


- पुन्हा चॉकलेट नको, पोलिसांनी सहकार्य करावे, तुम्ही खांद्याला खांदा लावून सहकार्य करा
- कुटुंबासाठी ही लढाई सुरू आहे
- बेस्ट टिकली तरच चांगली वाहतूक सेवा मुंबईकरांना मिळेल

12:43 PM

बेस्ट कर्मचारी राज ठाकरेंच्या भेटीला

बघतो, बोलतो... मदत मागायल्या गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंचं मोघम आश्वासन

12:16 PM

घरं खाली करण्याच्या कारवाईविरोधात वडाळा बस आगारावर कामगारांचा मोर्चा

12:10 PM

वडाळा आगारा आंदोलन

10:20 AM

सकाळी 11 वाजता कृष्णकुंजवर बैठक

(BEST Strike : मनसेचा बेस्टच्या संपाला पाठिंबा, संपकरी कर्मचारी राज ठाकरेंची भेट घेणार)

09:48 AM

बेस्ट संपाला मनसेचा पाठिंबा


09:17 AM

मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर लोकलच्या जादा फेऱ्या

09:06 AM

बेस्ट संपाचा तिसरा दिवस : एकही बस आगाराबाहेर पडलेली नाही
बेस्ट उपक्रमाने वसाहतीतील खोल्या रिकाम्या करण्याची नोटीस पाठवल्यामुळे कामगारांमध्ये संताप
कारवाईच्या निषेधार्थ कामगारांच्या पत्नींचा वडाळा बस आगारावर आज दुपारी मोर्चा 

09:00 AM

कृती समितीचे नेते शशांक राव यांचा वडाळा बस आगारावर कर्मचारी कुटुंबातर्फे मोर्चा काढण्याचा इशारा 

08:58 AM

बेस्टच्या तिढ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार मध्यस्थी 
उद्धव ठाकरे यांची आयुक्त महापौर, बेस्ट समिती अध्यक्ष, आयुक्तांसोबत दुपारी चर्चा
 

08:56 AM


08:56 AM

संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट भवनात तातडीची बैठक,  बेस्ट महाव्यवस्थापकांसमोर सकाळी 9 युनियनची बैठक
 

Web Title: BEST Strike Live : चर्चा निष्फळ; बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.