राजकारण करणाऱ्यांपासून सावध रहा - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 07:01 AM2018-06-28T07:01:07+5:302018-06-28T07:01:09+5:30

संपकाळात एसटी, शिवशाही बसची तोडफोड सहन करण्यासारखी नव्हती. परिवहनमंत्री आपलेच आहेत, त्यामुळे अशी तोडफोड करून आपल्याच पायावर धोंडा मारू नका.

Be cautious of politicians - Uddhav Thackeray | राजकारण करणाऱ्यांपासून सावध रहा - उद्धव ठाकरे

राजकारण करणाऱ्यांपासून सावध रहा - उद्धव ठाकरे

Next

मुंबई : संपकाळात एसटी, शिवशाही बसची तोडफोड सहन करण्यासारखी नव्हती. परिवहनमंत्री आपलेच आहेत, त्यामुळे अशी तोडफोड करून आपल्याच पायावर धोंडा मारू नका. रस्त्यात धोंडे पेरून राजकारण करणाºयांपासून सावध रहा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाºयांना केले.
संपकाळात बडतर्फ केलेल्या १,०१० कर्मचाºयांना पुन्हा संधी देऊन कामावर घ्यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी १ जुलै २०१८ पासून या कर्मचाºयांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर कर्मचाºयांनी ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. ठाकरे म्हणाले, मराठी माणसाला न्याय मिळायलाच पाहिजे, पण शिवशाही फुटल्याचा तो आवाज सहन होण्यासारखा नव्हता. परिवहनमंत्री आपलेच असल्याने असा आपल्याच पायावर धोंडा मारू नका. रावते यांचा संपकाळातील निर्णय मंत्र्याचा होता, पण नंतर कामगारांना कामावर घेऊन त्यांनी शिवसैनिकाची भूमिका बजावली आहे.
रस्ते असोत, नसोत, महाराष्ट्राच्या कानाकोपºयात पोहोचून कर्तव्य बजावणाºया एसटी कामगारांचे त्यांनी कौतुक केले. एसटी महाराष्ट्राची रक्तवाहिन्या आहे. अन्याय झाला असा वास आला, तरी माझ्याकडे या, असेही ते म्हणाले. या वेळी एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष आणि खासदार अरविंद सावंत, भारतीय कामगार सेना महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Be cautious of politicians - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.