महापालिका कामगार संपाच्या तयारीत, संघटनांमध्ये श्रेयाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 04:41 AM2019-02-09T04:41:56+5:302019-02-09T04:42:12+5:30

बेस्ट कामगारांचा संप यशस्वी ठरल्यानंतर आता महापालिकेतही संपाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

The battle of Shreya in the organization, organized by the corporation workers movement | महापालिका कामगार संपाच्या तयारीत, संघटनांमध्ये श्रेयाची लढाई

महापालिका कामगार संपाच्या तयारीत, संघटनांमध्ये श्रेयाची लढाई

googlenewsNext

मुंबई : बेस्ट कामगारांचा संप यशस्वी ठरल्यानंतर आता महापालिकेतही संपाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे महापौर आणि आयुक्तांबरोबर यशस्वी वाटाघाटी झाल्याचा दावा काही कामगार संघटना करीत असताना १७ इतर संघटनांच्या येत्या सोमवारपासूून बैठका होणार आहेत. त्यानंतर ८ ते १६ एप्रिलदरम्यान कामगारांचे मतदान घेऊन संपाबाबत निर्णय होणार आहे. कामगार संघटनांमध्ये श्रेयाची लढाई येत्या काळात रंगताना दिसणार आहे.
बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी मतदानाद्वारे कामगारांचा कौल घेऊन संप पुकारला होता. नऊ दिवसांचा हा संप ऐतिहासिक ठरल्यामुळे शशांक राव यांना अन्य संघटनेच्या कामगार सभासदांचेही समर्थन मिळू लागले. बेस्टच नव्हे तर महापालिकेतील कामगार संघटनांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली. राव यांनी महापालिकेकडे मोर्चा वळविण्याआधी शिवसेना प्रणित संघटनेसह काही कामगार संघटनांनी प्रशासनाबरोबर वाटाघाटी सुरू केल्या. मात्र इतर १७ संघटनांनी एकत्रित येऊन परळमधील मित्रधाम सभागृहात गुरूवारी बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेत मतदान घेण्याचा निर्णय झाला. हे मतदान पालिकेच्या सात झोन मध्ये घेण्यात येणार आहे. १८ एप्रिल रोजी मतदान घेतल्यानंतर त्यात मिळालेल्या कौलनुसार संपाचा निर्णय होईल, अशी माहिती राव यांनी दिली.

श्रेयाची लढाई

कामगार नेते अ‍ॅड. प्रकाश देवदास यांच्या कामगार संघटनेने पालिका प्रशासनासोबत केलेल्या वाटाघाटी मान्य नाहीत. त्यामुळे कामगारांचे नुकसान होणार असल्याची टीका राव यांनी केली आहे.
महापालिका कामगारांच्या मागण्या
सातव्या वेतन आयोगात स्पष्टता नाही, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटीमुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे.
बायोमेट्रीक पध्दतीतील गोंधळ दूर करा, वैद्यकीय विमा संरक्षण दहा लाख रुपये करा.
कंत्राटी कामगारांना कायम करा, ग्रेड पे आणि वेतन निश्चितीतील गोंधळ दूर करा, रिक्त आणि पदोन्नतीच्या जागा भरा. २००८ पासून भरती झालेल्या कामगारांना आणि अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करा.

Web Title: The battle of Shreya in the organization, organized by the corporation workers movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.