बँक अधिकारी संघवी हत्येमागे ‘दृश्यम्’कांड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 05:33 AM2018-09-12T05:33:13+5:302018-09-12T05:33:45+5:30

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सरफराज शेखच्या कबुलीमुळे पोलिसांमध्ये संशय आहे.

Bank officials 'visible' | बँक अधिकारी संघवी हत्येमागे ‘दृश्यम्’कांड

बँक अधिकारी संघवी हत्येमागे ‘दृश्यम्’कांड

Next

मुंबई : एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सरफराज शेखच्या कबुलीमुळे पोलिसांमध्ये संशय आहे. ‘मीच मारले. नंतर कल्याणमध्ये मृतदेह फेकून कार नवी मुंबईत पार्क केली,’ असे सांगणारा सरफराज ठरवून घटनाक्रम सांगत असल्याचा संशय पोलिसांना आहे. ‘दृश्यम्’ या चित्रपटातील कथानकाप्रमाणे तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.
मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला सरफराज हा २०११मध्ये मुंबईत आला. सध्या तो कोपरखैरणे येथील सेक्टर १२मधील मामू इमारतीत आठ महिन्यांपासून भाड्याने राहत होता. त्याचे आईवडील गावी असतात. कल्याणच्या एका वर्कशॉपमध्ये त्याने वेल्डर म्हणून नोकरी केली. पुढे तो फॅब्रिकेशनच्या कामासाठी मुंबईतल्या विविध ठिकाणी जात असे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने ओला कंपनीद्वारे कर्जाने कार घेतली. याच कारचे हफ्ते फेडण्यासाठी त्याने गेल्या महिन्यात मित्राकडे दुचाकी गहाण ठेवली.
कर्ज फेडण्यासाठी त्याला ३० ते ३२ हजारांची गरज होती. याच उद्देशाने त्याने संघवी यांच्याकडे पैशांची मागणी केली. यातूनच त्याने त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न फसल्यानंतर त्यांची हत्या केल्याचे तो सांगतो. मात्र तो सांगत असलेली माहिती संशयास्पद आहे. या प्रकरणी सखोल तपास पोलिसांसह गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
‘दृश्यम्’ या चित्रपटातील कथानकाप्रमाणे सरफराजने दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. त्याने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार, पोलीस तपास करीत असले तरी त्याने ही हत्या केली, की यामागे दुसरा कोणी आहे? या सर्वांचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हापूरमध्ये त्याच्या मित्राकडे चौकशी केली. मात्र त्याच्याकडून काहीच हाती न लागल्याने पथक मंगळवारी मुंबईला रवाना झाले.
>माहितीतून दिशाभूल
‘दृश्यम्’ या चित्रपटातील कथानकाप्रमाणे सरफराजने दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Bank officials 'visible'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.