शिक्षण शुल्कासह निर्वाहभत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 05:25 AM2017-11-22T05:25:56+5:302017-11-22T05:26:44+5:30

पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्कासाठी देण्यात येणा-या ५० टक्के रकमेच्या ६० टक्के रक्कम आणि निर्वाहभत्त्याची सर्व रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

In the bank account of the resident students with the education fee | शिक्षण शुल्कासह निर्वाहभत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर

शिक्षण शुल्कासह निर्वाहभत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर

Next

मुंबई : आॅनलाइन शिष्यवृत्ती देण्यातून निर्माण झालेले घोळ आणि त्यामुळे होणारी नाराजी टाळण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षातल्या (२०१७-१८मधील) पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्कासाठी देण्यात येणा-या ५० टक्के रकमेच्या ६० टक्के रक्कम आणि निर्वाहभत्त्याची सर्व रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
अनेक महाविद्यालयांची व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सामाजिक न्याय व इतर विभागांकडे प्रलंबित आहे. तसेच २०१७-१८पासून राज्य शासनाने सुरू केलेले महाडीबीटी पोर्टल परिपूर्णरीत्या कार्यान्वित करणे सुरू आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, शिक्षण व परीक्षा शुल्क इत्यादींची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब लागू शकतो. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.
केंद्र व राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती किंवा फ्री-शिप योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१०-११ ते २०१६-१७ पर्यंत विविध विभागांकडील प्रलंबित शैक्षणिक संस्था-महाविद्यालयांना द्यावयाच्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम तदर्थ तत्त्वावर संबंधित संस्था-महाविद्यालयांना आॅफलाइन पद्धतीने देण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तसेच ७ वर्षांच्या कालावधीतील विद्यार्थ्यांना द्यायच्या निर्वाहभत्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

Web Title: In the bank account of the resident students with the education fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.