केमिस्ट संघटनांचा एफडीएवर निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:45 AM2018-07-17T01:45:01+5:302018-07-17T01:45:05+5:30

वांद्रे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयावर केमिस्ट संघटनांनी सोमवारी दुपारी निषेध मोर्चा काढला.

Ban on the FDO ban on Chemists Organizations | केमिस्ट संघटनांचा एफडीएवर निषेध मोर्चा

केमिस्ट संघटनांचा एफडीएवर निषेध मोर्चा

Next

मुंबई : वांद्रे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयावर केमिस्ट संघटनांनी सोमवारी दुपारी निषेध मोर्चा काढला. दुपारी भर पावसातदेखील केमिस्ट संघटनांच्या जवळपास ४०० हून अधिक सदस्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयाबाहेर गर्दी करायला सुरुवात केली. ‘आॅनलाइन फार्मसीचा आम्हाला स्विकार नाही’ असा संदेश लिहिणारे फलकही हातात घेऊन या सदस्यांनी घोषणाबाजी केली. आॅनलाइन औषध विक्रीला कायदेशीररीत्या मान्यता देण्यासाठी केंद्राने पावले उचलली असून, यासाठी कायद्याचा मसुदाही तयार केला आहे, पण आॅनलाइन फार्मसीला औषध विक्रेत्यांनी
तीव्र शब्दात विरोध दर्शविला आहे. आॅनलाइन फार्मसीमुळे एका क्लिकवर औषध उपलब्ध झाल्यास तरुणपिढी व्यसनाच्या आहारी जाऊ शकते, असे औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात एफडीएच्या अधिकाऱ्यांना व मंत्र्यांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
>...तर आरोग्यावर होईल दुष्परिणाम
महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष हुकुमराज मेहता यांनी सांगितले की, ‘गर्भनिरोधक गोळ्या, झोपेच्या गोळ्या सर्रास आॅनलाइन मिळतात. यांच्या जाहिराती टीव्हीवर दाखविल्या जात आहेत. आॅनलाइन फार्मसीला परवानगी नसतानाही सर्रास औषध विक्री सुरू आहे. एफडीए यावर ठोस कारवाई करत नाही. औषधांचा दर्जा आणि गुणवत्ता योग्य आहे किंवा नाही हे पाहता येत नसल्याने, रुग्णाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. याशिवाय आॅनलाइन फार्मसीमुळे महाराष्ट्रातील जवळपास ८ लाख औषध विक्रेते आणि ४० लाख कर्मचाºयांच्या नोकरीवर गदा येणार आहे.

Web Title: Ban on the FDO ban on Chemists Organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.