... त्यावेळी बाळासाहेबांनी मला ठाकरे शैलीत सुनावले, पवारांच्या 'आठवणीतले बाळासाहेब'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 09:55 AM2019-01-16T09:55:23+5:302019-01-16T09:57:31+5:30

ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनांतर्गत घेण्यात आलेल्या 'आठवणीतले बाळासाहेब' या कार्यक्रमात शरद पवार यांना बाळासाहेब आणि सुप्रिया यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

Balasaheb had told me in Thackeray style ..., sharad pawar | ... त्यावेळी बाळासाहेबांनी मला ठाकरे शैलीत सुनावले, पवारांच्या 'आठवणीतले बाळासाहेब'

... त्यावेळी बाळासाहेबांनी मला ठाकरे शैलीत सुनावले, पवारांच्या 'आठवणीतले बाळासाहेब'

googlenewsNext

मुंबई - बहुचर्चित ठाकरे सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यानिमित्त बाळासाहेबांच्या आठवणी जागविण्यात येत आहेत. चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत विविध कार्यक्रमातून चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. त्यातच, 'आठवणीतले बाळासाहेब' या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या आठवणीतला किस्सा सांगितला. तर, त्यावेळी बाळासाहेबांनी मला ठाकरी शैलीत सुनावले होते, असेही ते म्हणाले.  

ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनांतर्गत घेण्यात आलेल्या 'आठवणीतले बाळासाहेब' या कार्यक्रमात शरद पवार यांना बाळासाहेब आणि सुप्रिया यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी, पवारांनी आठवणीतले बाळासाहेब सर्वांना सांगितले. सुप्रिया तेव्हा वर्षांची महिन्यांची होती. मी संध्याकाळी बाळासाहेबांच्या घरी गेलो होतो. माझ्याकडे तेव्हा जीप होती, पावसाचा थोडा परिणाम झाला. त्यामुळे तिचे कपडे भिजले होते. मी आपलं घरात गेल्यानंतर बाळासाहेबांनी नेहमीप्रमाणे तिला कडेवर घेतले. मात्र, तिचे कपडे ओले झाल्याचे पाहिल्यानंतर बाळासाहेबांनी मला ठाकरी भाषेत काय सांगायचंय ते सांगितलं. त्यानंतर, लगेच सांगितल, माँ ताबडतोब टॉवेल आन आणि तिची काळजी घे. म्हणजे, अगदी लहान असल्यापासून बाळासाहेंबाच्या अंगा खांद्यावर खेळलीय सुप्रिया, असं हे बाळासाहेब अन् सुप्रियाचा नातं होतं. अशा शब्दात शरद पवारांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच बाळासाहेब आणि त्यांचे मैत्रिपूर्ण, घरगुती संबंधही या किस्स्यातून सांगितले. दरम्यान, या कार्यक्रमात पवारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचाही किस्सा सांगितला. त्यामध्ये बाळासाहेबांची मनधरणी करायची जबाबदारी माझ्याकडे असायची, हेही त्यांनी उदाहरणासह सांगितले. 

Web Title: Balasaheb had told me in Thackeray style ..., sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.