Awarded the Yashwantrao Chavan Writings, Marathi Language Minister Vinod Tawde | ‘यशवंतराव चव्हाण वाङ्मयीन’ पुरस्कार जाहीर, मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांची माहिती
‘यशवंतराव चव्हाण वाङ्मयीन’ पुरस्कार जाहीर, मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबई : मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणारे यशवंतराव चव्हाण राज्य वांङमय पुरस्कार २०१६ सोमवारी जाहीर करण्यात आले. मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मितीस हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. काव्य , नाटक, एकांकिका, कांदबरी, लघुकथा, ललितगद्य, दलित साहित्य, शिक्षण शास्त्र, बाल वाङमय, आदी ३५ प्रकारात विविध लेखक, साहित्यिकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोमवारी पुरस्कारांची घोषणा केली.
पुरस्कार पुढीलप्रमाणे अनुक्रमे लेखकाचे नाव, पुरस्काराचे नाव, वाड्मय प्रकार आणि पुस्तक :
दिनकर मनवर - ‘कवी केशवसुत (प्रौढ वाड्मय, अजूनही बरचं काही बाकी), अजित अभंग - बहिणाबाई चौधरी (प्रथम प्रकाशन काव्य, गैबान्यावानाचं), डॉ.आनंद कुलकर्णी - राम गणेश गडकरी (प्रौढ वाड्मय नाटक/एकांकिका, त्या तिघांची गोष्ट), प्रा.के.डी वाघमारे - विजय तेंडुलकर (प्रथम प्रकाशन नाटक/एकांकिका, क्षितिजा पलीकडे), सदानंद देशमुख - हरी नारायण आपटे (प्रौढ वाड्मय कादंबरी, चारीमेरा), श्रीरंजन आवटे - श्री. ना.पेंडसे पुरस्कार (प्रथम प्रकाशन कादंबरी, सिंगल मिंगल), नीलम माणगावे - दिवाकर कृष्ण (प्रौढ वाड्म लघुकथा, निर्भया लढते आहे), दुर्योधन अहिरे - ग.ल.ठोकळ (प्रथम प्रकाशन लघुकथा, जाणीव), विनायक पाटील - अनंत काणेकर (प्रौढ वाड्मय ललितगद्य, गेले लिहायचे राहून), रश्मी काशेळकर - ताराबाई शिंदे (प्रथम प्रकाशन ललितगद्य, भुईरिंगण), बब्रूवान रुद्रकंठावार - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (प्रौढ वाड्मय विनोद, आमादमी विदाऊट पार्टी), अरुण करमरकर - न.चि.केळकर (प्रौढ वाड्मय चरित्र, पोलादी राष्ट्रपुरुष), राम नाईक - लक्ष्मीबाई टिळक (प्रौढ वाड्मय आत्मचरित्र, चरैवेति!चरैवेति!!), विश्राम गुप्ते - श्री.के.क्षीरसागर (प्रौढ वाड्मय समीक्षा/वाड्मयीन, नवं जग, नवी कविता), बाळू दुगडूमवार - रा.भा.पाटणकर (प्रथम प्रकाशन समीक्षा/सौंदर्यशास्त्र, बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद), आतिवास सविता - डॉ.बाबासाहेब आंबेडकर (प्रौढ वाड्मय राज्यशास्त्र/समाजशास्त्र, भय इथले...तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव), विजय आपटे - शाहू महाराज (प्रौढ वाड्मय इतिहास, शोध महाराष्ट्राचा), तन्मय केळकर - नरहर कुरुंदकर (प्रौढ वाड्मय भाषाशास्त्र/व्याकरण, मैत्री संस्कृतशी), डॉ.माधवी ठाकूरदेसाई - महात्मा ज्योतिबा फुले (प्रौढ वाड्मय विज्ञान व तंत्रज्ञान, प्रकाशवेध), प्रशांत नाईकवाडी - वसंतराव नाईक (प्रौढ वाड्मय शेती व शेतीविषयक, तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती), प्रा.डॉ.सुरेश चौथाईवाले- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (प्रौढ वाड्मय दलित साहित्य, मातंग चळवळीचा इतिहास), अतुल कहाते - सी.डी.देशमुख (प्रौढ वाड्मय अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन, पैसा), डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे - ना.गो.नांदापूरकर (प्रौढ वाड्मय तत्वज्ञान व मानसशास्त्र, लोकनिष्ठ अध्यात्मवाद), डॉ.पुरुषोत्तम भापकर - कर्मवीर भाऊराव पाटील (प्रौढ वाड्मय शिक्षणशास्त्र, हे शक्य आहे !), प्रा. पुंडलिक गवांदे - डॉ.पंजाबराव देशमुख (प्रौढ वाड्मय पर्यावरण, देतो तो निसर्ग, घेतो तो मानव), डॉ.द.ता.भोसले - रा.ना.चव्हाण (प्रौढ वाड्मय संपादित/आधारित, रा.रं.बोराडे : शिवारातला शब्दशिल्पकार), जयंत कुलकर्णी - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (प्रौढ वाड्मय अनुवादित, देरसू उझाला), डॉ.जनार्दन वाघमारे - भाई माधवराव बागल (प्रौढ वाड्मय संकीर्ण क्रीडासह, शरद पवार व्यक्तिमत्त्व, नेतृत्त्व आणि कर्तृत्त्व), माया दिलीप धुप्पड - बालकवी (बालवाड्मय कविता, सावल्यांच गाव), डॉ.सतीश साळुंके - भा.रा.भागवत (बालवाड्मय नाटक/एकांकिका, उदाहरणार्थ), प्रा.डॉ.जे.एन.गायकवाड - साने गुरुजी (बालवाड्मय कादंबरी, कथा एका महामानवाची), डॉ. विशाल तायडे - राजा मंगळवेढेकर (बालवाड्मय कथा, प्राण्यांचा व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर गोष्टी), बी.बी.जाधव - यदुनाथ थत्ते (बालवाड्मय सर्वसामान्य ज्ञान, गणितस्य कथा रम्या), सोनाली गावडे - ना.धो.ताम्हणकर (बालवाड्मय संकीर्ण, माझी दैनंदिनी), अनिल परुळेकर - सयाजी महाराज गायकवाड (सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र, काझा पिंतु)


Web Title: Awarded the Yashwantrao Chavan Writings, Marathi Language Minister Vinod Tawde
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.