पोलिसांवरील गुन्ह्यांची माहिती देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 03:15 AM2018-01-15T03:15:05+5:302018-01-15T03:15:23+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार पारदर्शी कारभाराची ग्वाही देत असताना, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या गृहविभागाकडून गुन्हा दाखल असलेल्या पोलीस

 Avoid reporting crime to police | पोलिसांवरील गुन्ह्यांची माहिती देण्यास टाळाटाळ

पोलिसांवरील गुन्ह्यांची माहिती देण्यास टाळाटाळ

Next

जमीर काझी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार पारदर्शी कारभाराची ग्वाही देत असताना, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या गृहविभागाकडून गुन्हा दाखल असलेल्या पोलीस अधिका-यांची माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी माहिती अधिकार कायद्यान्वये दाखल असलेल्या अपिलात प्रथम अपील अधिकाºयांनी त्याबाबतची माहिती देण्याचे आदेश देऊनही, गृहविभागाच्या पोल-३ कक्षाने माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे, तसेच विलंब होत असल्यास माहिती आयुक्तांकडे अपील करू शकता, असे उत्तर अवर सचिवांकडून देण्यात आले आहे.
राज्य पोलीस दलात गेल्या चार वर्षांत स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या किंवा त्यासाठी अर्ज केलेल्या अप्पर अधीक्षक, उपायुक्त दर्जांच्या अधिकाºयांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी, तसेच दाखल गुन्ह्यांची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीने गृहविभागाकडे मागितली होती. मात्र, पोल-२च्या विभागाकडून गोपनीयतेच्या कारणास्तव माहिती पुरविण्यास नकार देण्यात आला. त्याविरुद्ध प्रथम अपील अधिकाºयांकडे दाद मागितल्यानंतर, ४ डिसेंबरला उपसचिव कैलास गायकवाड यांच्याकडे सुनावणी झाली. त्यात गायकवाड यांनी पोल-२ च्या कार्यासनाला संबंधित अधिकाºयांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्याचे निर्देश दिले. त्याबाबतचे लेखी आदेश ६ डिसेंबरला बजावले. मात्र, या कक्षाकडून माहिती पुरविण्यात आली नाही. त्यामुळे गुरुवारी पोल-२चे अवर सचिव दीपक पोकळे यांची भेट घेऊन विचारणा केली असता, सुरुवातीला त्यांनी असे आदेश मिळाले नसल्याचे सांगितले. त्यांना आदेशाची प्रत दाखवल्यानंतर त्यांनी आमच्या विभागाकडे पाठवले आहेत का? याची खातरजमा करतो. मात्र, माहिती कधीपर्यंत मिळेल ते सांगू शकत नाही, जर तुम्हाला वाटत असल्यास, त्याबाबत द्वितीय अपील करू शकता, असे सांगितले.

कक्षाकडून महिनाभर कानाडोळा : प्रथम अपील अधिकाºयाने दिलेल्या आदेशानंतर, सुमारे आठवडाभराच्या कालावधीत संबंधित माहितीची पूर्तता करावी, असे अभिप्रेत आहे. मात्र, गृहविभागाच्या पोल-२ ने महिना उलटून गेला, तरी त्याबाबत कार्यवाही केली नाही. इतकेच नव्हे, तर आदेशाची प्रतही कक्षाकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे अर्जदाराकडील प्रतीची झेरॉक्स काढून घेतली.
आदेशाची प्रत मिळालेली नाही : अपील अधिकाºयांनी दिलेल्या आदेशाची प्रत आम्हाला मिळालेली नाही, त्याबाबत मी खातरजमा करतो, संबंधित माहिती केव्हा दिली जाईल, हे सांगू शकत नाही, उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला कळविले जाईल.
- दीपक पोकळे, अवर सचिव, पोल-२, गृहविभाग

Web Title:  Avoid reporting crime to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.