पोलीस दलात AI चा वापर, रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ; राज्य सरकारचे १७ निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 01:54 PM2024-03-16T13:54:57+5:302024-03-16T14:05:46+5:30

आज केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे. दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची आणि आचारसंहितेची घोषणा करण्यात येणार आहे.

Artificial Intelligence in Police Force, Welfare Board for Rickshaw, Taxi Drivers maharashtra Cabinet decision | पोलीस दलात AI चा वापर, रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ; राज्य सरकारचे १७ निर्णय

पोलीस दलात AI चा वापर, रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ; राज्य सरकारचे १७ निर्णय

आज केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे. दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची आणि आचारसंहितेची घोषणा करण्यात येणार आहे, त्याआधी राज्यसरकारने मंत्रिमंडळ बैठक घेत मोठे निर्णय घेतले आहेत. आज झालेल्या बैठकीत राज्य सरकारने १७ मोठे निर्णय घेतले आहेत. 'राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला ५० कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे.  १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी भागभांडलीचीही घोषणा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे.

"अंबादास, मी अन् उद्धव ठाकरे रात्री एकत्र"; राऊतांनी सांगितली दानवेंची 'मन की बात'

वैद्यकीय विभागात तात्पुरत्या स्वरुपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्यात येणार आहे. तसेच आता यापुढे मालमत्ता विद्रूपीकरण करणाऱ्यांसाठी गृह विभागाने दंड वाढविला असून एक वर्षाचा कारावासही होणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

देशात आज लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे, यामुळे उद्यापासून राज्य सरकारला मंत्रिमंडळ बैठक घेता येणार नाही. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू आहेत. दरम्यान, आज केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करु शकते. यामुळे आज सकाळीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी
( उद्योग विभाग)

तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार*
( वैद्यकीय शिक्षण विभाग) 

मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला
( गृह विभाग)

१३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.  
( विधि व न्याय)

संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार
(सांस्कृतिक कार्य)

शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण 
(सांस्कृतिक कार्य)

विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल
( इतर मागास)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
( पशुसंवर्धन विभाग)

हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली "मॅनहोलकडून मशीनहोल" कडे योजना
( सामाजिक न्याय विभाग)

संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार
( गृह विभाग)

राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
( गृह विभाग)

ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान
( परिवहन विभाग)

भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप
( महसूल विभाग) 

संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार
( गृह विभाग) 

वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन
( सांस्कृतिक कार्य)

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर
( सामान्य प्रशासन विभाग)

श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
( महसूल व वन)

Web Title: Artificial Intelligence in Police Force, Welfare Board for Rickshaw, Taxi Drivers maharashtra Cabinet decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.