रस्त्यावर कचरा टाकणा-याला अनुष्काने विचारला जाब, विराटने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 21:47 IST2018-06-16T21:39:48+5:302018-06-16T21:47:58+5:30

अनुष्का शर्मा रस्त्यावर कचरा फेकणा-या कारमालकावर चांगलीच भडकली. तिने रस्त्यावर कचरा का टाकला, असा सवाल करत डस्टबीनमध्ये टाकण्याचा सल्ला दिला.

Ants asked about the rubbish on the road, shared the video | रस्त्यावर कचरा टाकणा-याला अनुष्काने विचारला जाब, विराटने शेअर केला व्हिडीओ

रस्त्यावर कचरा टाकणा-याला अनुष्काने विचारला जाब, विराटने शेअर केला व्हिडीओ

मुंबई : सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर जास्त सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्याने आपली पत्नी अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये अनुष्का शर्मा रस्त्यावर कचरा टाकणा-या व्यक्तीला जाब विचारताना दिसत आहे. 

अनुष्का शर्मा आपल्या कारमधून प्रवास करत असताना एका दुस-या कार मालकाने रस्त्यावर कचरा फेकला. यावेळी अनुष्का शर्माने त्या कारला थांबविले आणि कचरा फेकणा-या कारमालकावर चांगलीच भडकली. तिने रस्त्यावर कचरा का टाकला, असा सवाल करत डस्टबीनमध्ये टाकण्याचा सल्ला दिला. यावेळी तिचा व्हिडीओ बहुतेककरुन विराटनेच काढल्याचे समजते.


दरम्यान, हा व्हिडीओ विराटने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, या लोकांना रस्त्यावर कचरा टाकल्यानंतर त्यांना योग्य प्रकारे फटकारले. महागड्या कारमध्ये प्रवास करतात पण यांची बुद्धी खराब आहे. अशा व्यक्ती आपला देश स्वच्छ नाही ठेवू शकत का? जर तुम्ही देखील असे होताना पाहिले तर असेच करा. जनजागृती पसरवा.



 

Web Title: Ants asked about the rubbish on the road, shared the video