शासकीय दर्जासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद  मैदानात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2024 03:26 PM2024-01-02T15:26:25+5:302024-01-02T15:26:54+5:30

श्रीकांत जाधव मुंबई  - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन देण्यात यावा, कर्मचाऱ्यांचे मानधन २५ हजारापर्यंत वाढवावे अशा ...

Anganwadi workers protest in Azad Maidan for government status | शासकीय दर्जासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद  मैदानात आंदोलन

शासकीय दर्जासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद  मैदानात आंदोलन

श्रीकांत जाधव

मुंबई  - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन देण्यात यावा, कर्मचाऱ्यांचे मानधन २५ हजारापर्यंत वाढवावे अशा प्रमुख मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या हजारो कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आजाद मैदानात धरणे आंदोलन केले.

संघटनेच्या प्रमुख निमंत्रक माया परमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली अरुण गाडे, संजय म्हापले, व्हाय एम माटे, युवराज बैसने, रामकृष्ण पाटील आधी संघटना प्रमुख आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह या आंदोलनात सहभागी झाले होते.

गेल्या २८ दिवसांपासून अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत. मात्र त्याची दखल शासन अजिबात घेत नाही. शासनाकडून अद्याप एकही प्रतिनिधी आमच्याकडे चर्चासाठी आलेला नाही. त्यामुळे फक्त ही झाकी आहे उद्या भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा माया परमेश्वर यांनी यावेळी राज्य सरकारला दिला. या आंदोलनात नागपूर, औरंगाबाद, नगरपूर, पालघर रायगड, मुंबई  जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Anganwadi workers protest in Azad Maidan for government status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.