चेंबूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, घर कोसळून ४ जण जखमी, ११ जणांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 11:46 AM2023-11-29T11:46:04+5:302023-11-29T11:48:17+5:30

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

An incident of a house collapse due to a cylinder blast has been reported in the Chembur area of Mumbai | चेंबूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, घर कोसळून ४ जण जखमी, ११ जणांची सुखरूप सुटका

चेंबूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, घर कोसळून ४ जण जखमी, ११ जणांची सुखरूप सुटका

मुंबई : चेंबूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. येथील एका घरात गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. त्यामुळे घर कोसळून चौघे जण जखमी झाले. या घटनेमुळे अडकलेल्या ११ जणांना वाचविण्यात आले आहे. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चेंबुरमधील जुनी बॅरॅक गोल्फ क्लबजवळ असलेल्या एका दुमजली घरांच्या चाळीत ही घटना घडली आहे. चाळीतील सलग चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या घरात स्फोट झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच, बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी, वरच्या मजल्यावर अडकलेल्या व्यक्तींची सुखरुप सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चार जण जखमी झाले आहेत. या घटनेमध्ये आतापर्यंत ११ जणांची पहिल्या मजल्यावरून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर ४ जखमी व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. विकास अंभोरे (वय ५०), अशोक अंभोरे (२७ वर्षे), सविता अंभोरे (४७ वर्षे), रोहित अंभोरे (२९ वर्षे) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.

Web Title: An incident of a house collapse due to a cylinder blast has been reported in the Chembur area of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.