रमाबाई नगरातही बंद

By admin | Published: September 3, 2015 01:05 AM2015-09-03T01:05:05+5:302015-09-03T01:05:05+5:30

केंद्र सरकारने कामगार आणि शेतकऱ्यांबाबत आखलेल्या धोरणांविरोधात पुकारण्यात आलेला देशव्यापी बंद आज घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरातही यशस्वी करण्यात आला

Also in Ramabai town | रमाबाई नगरातही बंद

रमाबाई नगरातही बंद

Next

मुंबई : केंद्र सरकारने कामगार आणि शेतकऱ्यांबाबत आखलेल्या धोरणांविरोधात पुकारण्यात आलेला देशव्यापी बंद आज घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरातही यशस्वी करण्यात आला. यासाठी डाव्या विचारसरणीच्या विविध पक्ष-संघटना सक्रिय झाल्या होत्या.
रमाबाई आंबेडकर नगरात भारतीय कम्युनिस्ट पार्टी, भारिप-बहुजन महासंघ, जनता दल (से.), रिपब्लिकन सेना आदी डाव्या विचारसरणीच्या विविध पक्ष-संघटना एकवटल्या होत्या. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून फे री काढून केंद्र सरकारने कामगार आणि शेतकऱ्यांबाबत आखलेल्या धोरणाविरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. तसेच निषेध फे रीदरम्यान कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला मार्केटमधील व्यावसायिकांनी आपली दुकाने - व्यवसाय बंद करून सकारात्मक प्रतिसाद दिला. भारिप-बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष नीलेश अहिवळे, रिपब्लिकन सेनेचे सनी हिरे यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या आंदोलनाची सांगता ज्येष्ठ विचारवंत कलबुर्गी यांना आदरांजली वाहून करण्यात आली.

Web Title: Also in Ramabai town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.