गर्भपात करण्याची परवानगी द्या - सर्वोच्च न्यायालयात धाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:50 AM2017-08-12T06:50:12+5:302017-08-12T06:50:15+5:30

तेरा वर्षीय मुलीचे वजन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे, आई-बाबा तिला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी मुलगी साडेसहा महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.

Allow abortion - Run in the Supreme Court | गर्भपात करण्याची परवानगी द्या - सर्वोच्च न्यायालयात धाव  

गर्भपात करण्याची परवानगी द्या - सर्वोच्च न्यायालयात धाव  

Next

मुंबई : तेरा वर्षीय मुलीचे वजन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे, आई-बाबा तिला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी मुलगी साडेसहा महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चारकोप प्रकरणातील पीडित मुलगी ही २७ आठवड्यांची गर्भवती असल्याने, तिच्या तब्येतीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्वरित याविषयी निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे डॉ. निखिल दातार यांनी सांगितले आहे.
थायरॉईडमुळे मुलीचे वजन वाढत आहे, असे पालकांना वाटले. त्यामुळे पालक तिला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना मुलीची सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये मुलगी साडेसहा महिन्यांची
गर्भवती असल्याचे समजले. तिचे वय पाहता, तिला गर्भपातास परवानगी मिळावी, असे पालकांचे म्हणणे
आहे.

आरोपीला अटक
मुलीवरील बलात्कारप्रकरणी पालकांनी चारकोप पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी २२ वर्षीय मुलाला अटक केली आहे. हा मुलगा पीडित मुलीच्या शेजारीच राहतो. आरोपी हा मुलीच्या वडिलांसह इडलीच्या दुकानात काम करतो. त्यामुळे तिच्या घरी त्याचे जाणे-येणे होते. त्याच दरम्यान या मुलीसोबत त्याने हा प्रकार केल्याचे समजते.

Web Title: Allow abortion - Run in the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.