आदित्य चोप्रासह तिघांना ‘ईडी’ची नोटीस, हजारो कोटींचा रॉयल्टी नॉन-पेमेंट घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 05:37 AM2017-11-08T05:37:01+5:302017-11-08T05:37:11+5:30

बॉलीवूडचा आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक व यशराज फिल्मचा प्रमुख आदित्य चोप्रा, टी सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार व सारेगामा संगीत लेबलचे विक्रम मेहरा यांना

Aditya's notice to three, including Aditya Chopra, royalties for thousands of crores, non-payment scam | आदित्य चोप्रासह तिघांना ‘ईडी’ची नोटीस, हजारो कोटींचा रॉयल्टी नॉन-पेमेंट घोटाळा

आदित्य चोप्रासह तिघांना ‘ईडी’ची नोटीस, हजारो कोटींचा रॉयल्टी नॉन-पेमेंट घोटाळा

Next

मुंबई : बॉलीवूडचा आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक व यशराज फिल्मचा प्रमुख आदित्य चोप्रा, टी सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार व सारेगामा संगीत लेबलचे विक्रम मेहरा यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. हजारो कोटींच्या बहुराष्टÑीय ‘रॉयल्टी नॉन-पेमेंट’ घोटाळ्याप्रकरणी त्यांची नावे पुढे आल्याने, त्यांना चौकशीसाठी बोलवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सोनी म्युझिक कंपनी आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष श्रीधर सुब्रह्मण्यम, युनिव्हर्सल म्युझिकचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज सन्याल यांच्याकडे केलेल्या चौकशीतून त्यांची नावे पुढे आल्याने, त्यांना बोलावले आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडे चौकशी करण्यात येईल. हजारो कोटींच्या रॉयल्टी नॉन-पेमेंट घोटाळ्यासंबंधी सुब्रह्मण्यम व देवराज यांच्याशी झालेल्या संभाषणातून, आदित्य व अन्य दोघांच्या नावांचा उल्लेख आहे. संगीत क्षेत्रातील या दिग्ग्ज कंपन्यांकडे जून २०१२ पासून हजारो कोटींची थकबाकी दाखविली आहे. त्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे. कायद्यानुसार गीतकार व संगीतकार हे कंपन्यांनी मिळविलेल्या नफ्यामध्ये ५० टक्के रॉयल्टीला पात्र आहेत. मात्र, अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार प्रसारमाध्यमांच्या एक अहवालात टी सीरिजने गेल्या सहा वर्षांत २००० कोटींची रॉयल्टी एकत्रित केली आहे. त्यामधील ५० टक्के लोक हे गीतकार व संगीतकार आहेत. या प्रकरणी गेले दोन दिवस भूषणकुमार यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे.

Web Title: Aditya's notice to three, including Aditya Chopra, royalties for thousands of crores, non-payment scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.