महाशिवरात्री' निमित्त अतिरिक्त बेस्ट गाड्या, बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांसाठी सोय  

By सीमा महांगडे | Published: March 6, 2024 06:40 PM2024-03-06T18:40:30+5:302024-03-06T18:40:55+5:30

Mumbai News: येत्या शुक्रवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईच्या काही भागात पर्यटनाला येणा-या पर्यटकांची संख्या वाढते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीकरीता बेस्ट उपक्रमाच्यावतीने काही अतिरिक्त बसगाड्या सुरु ठेवण्यात येणार आहेत.

Additional BEST trains on the occasion of Mahashivratri, convenience for passengers from BEST activities | महाशिवरात्री' निमित्त अतिरिक्त बेस्ट गाड्या, बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांसाठी सोय  

महाशिवरात्री' निमित्त अतिरिक्त बेस्ट गाड्या, बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांसाठी सोय  

- सीमा महांगडे 
मुंबई - येत्या शुक्रवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईच्या काही भागात पर्यटनाला येणा-या पर्यटकांची संख्या वाढते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीकरीता बेस्ट उपक्रमाच्यावतीने काही अतिरिक्त बसगाडया सुरु ठेवण्यात येणार आहेत. 'कान्हेरी गुंफा येथील पुरातन लेण्यांना भेट देणा-या प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्ग क्र. १८८ मर्या. या बसमार्गावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुंफा दरम्यान सकाळी ११.०० वा. पासून ते संध्याकाळी १९.३० वा. पर्यंत एकूण ६ जादा बसगाडया प्रवर्तित करण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली रेल्वे स्थानक (पूर्व) ते कान्हेरी गुंफा दरम्यान नियमित बससेवा देखील कार्यरत राहणार आहे.

अतिरिक्त बस गाड्या सोबतच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी विशेषतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार, एलोरा चौकी (बोरिवली स्थानक-पूर्व) तसेच कान्हेरी गुंफा येथे बसनिरीक्षक आणि वाहतूक अधिका-यांची बेस्टकडून नियुक्ती करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त बाबुलनाथ येथील शिवमंदिरास भेट देणा-या भाविकांच्या सोयीसाठी सकाळी ७.०० ते संध्याकाळी १९.०० यादरम्यान बसमार्ग क्र. ५७,६७ आणि १०३ या बसमार्गावर एकूण ६ जादा बसगाडया प्रवर्तित करण्यात येणार आहेत. बाबुलनाथ मंदिर येथे भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक अधिकारी व बसनिरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Web Title: Additional BEST trains on the occasion of Mahashivratri, convenience for passengers from BEST activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.