दररोज दोन हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:00 AM2018-06-04T02:00:20+5:302018-06-04T02:00:20+5:30

बेदरकारपणे वाहन चालवणे, विनाहेल्मेट, सीट बेल्ट न लावणे अशा गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना शहरात सीसीटीव्हींचे जाळे उपयुक्त ठरत आहे. एप्रिल महिन्यात नियम मोडणाऱ्या ५० हजारांहून अधिक मुंबईकरांना सीसीटीव्ही चलान पाठवण्यात आले.

 Action on two thousand unguented drivers daily | दररोज दोन हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

दररोज दोन हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

Next

- महेश चेमटे

मुंबई : बेदरकारपणे वाहन चालवणे, विनाहेल्मेट, सीट बेल्ट न लावणे अशा गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना शहरात सीसीटीव्हींचे जाळे उपयुक्त ठरत आहे. एप्रिल महिन्यात नियम मोडणाऱ्या ५० हजारांहून अधिक मुंबईकरांना सीसीटीव्ही चलान पाठवण्यात आले. तर जवळपास दररोज एक हजार ८७८ मुंबईकरांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे
बेशिस्त वाहन चालवणाºया चालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांना शहरातील ५ हजारांहून अधिक असलेले सीसीटीव्हींचे जाळे उपयुक्त ठरत आहे. या सीसीटीव्हीच्या माध्यमाने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होते. जानेवारी ते जून या कालावधीत एकूण १ लाख ४८ हजार ९०२ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यात तब्बल ५६ हजार ३५८ बेशिस्त वाहनचालकांवर सीसीटीव्ही चलानद्वारे कारवाई करण्यात आली. एप्रिल महिन्यात रोज सरासरी एक हजार ८७८ आणि एका तासात ७९ वाहनचालकांवर कारवाई केल्याचे स्पष्ट होत आहे. मे महिन्यात ५२ हजार ६३० वाहनचालकांवर ई-चलानद्वारे कारवाई करण्यात आली आहे. तर सर्वाधिक कमी ८ हजार ६९१ सीसीटीव्ही चलान फेब्रुवारी महिन्यात काढण्यात आले आहेत.
बेशिस्त वाहन चालवू नये, हेल्मेट वापरा, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक टाळावे, सिग्नलसाठी थांबावे, शिस्तीत वाहन चालवल्यामुळे अनावश्यक वाहतूककोंडीचा देखील त्रास टाळणे शक्य आहे, असे आवाहनदेखील वाहतूक पोलिसांनी केले आहे.

चलो जी, हेल्मेट पहन के आ जा ओए...
रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने रस्ता सुरक्षाविषयक ध्वनिचित्रफितीची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी अभिनेता अक्षय कुमारची निवड करण्यात आली आहे. चित्रीकरणासाठी अक्षय कुमार कुलाबा वाहतूक कार्यालयात आला होता.

तुम्ही नियम मोडलेत; संकेतस्थळावर पाहा
तुम्हीदेखील वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे का? तुमच्या वाहनांवर सीसीटीव्ही चलान आहे की नाही हे पाहण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. संकेतस्थळावर ई-चलान विभागावर क्लिक करा. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असे पर्याय निवडा. आपला वाहन क्रमांक टाकून आपल्या वाहनांवर ई-चलान आहे की नाही याची खात्री करा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

‘सुट्टीच्या महिन्यात ई-चलानचा बोलबाला’
सुट्टीचा महिना म्हणून एप्रिल महिना सर्वसामान्यपणे मानला जातो. या महिन्यात बहुतांशी नागरिक गावी जातात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या निष्क्रियतेमुळे नागरिक खासगी वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. मात्र नागरिकांकडून वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते.

स्व-सुरक्षेसाठी पाळा नियम!
वाहतूक पोलीस पाहून हेल्मेट घालणे किंवा सिग्नलवर वाहतूक पोलीस असल्यावरच सिग्नलसाठी थांबणे ही सवय मोडणे गरजेचे आहे. स्व-सुरक्षेसाठी आणि अनावश्यक वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करा. मुंबई वाहतूक पोलिसांच्या संकेतस्थळावरून आपल्या वाहनांवर ई-चलान असल्यास त्वरित
दंड भरा. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त, वाहतूक विभाग

Web Title:  Action on two thousand unguented drivers daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.