ई-सिगारेट, हुक्का विक्रीवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 05:49 AM2019-04-20T05:49:11+5:302019-04-20T05:49:14+5:30

ई-सिगारेटच्या वापरामुळे तरुणपिढीचे जीवन धोक्यात आहे.

Action on e-cigarette, hookah sale | ई-सिगारेट, हुक्का विक्रीवर कारवाई

ई-सिगारेट, हुक्का विक्रीवर कारवाई

Next

मुंबई : ई-सिगारेटच्या वापरामुळे तरुणपिढीचे जीवन धोक्यात आहे. या पिढीतील मुला-मुलींना ई-सिगारेट असो वा हुक्का अगदी सहज उपलब्ध होतो. त्यामुळे ई-सिगारेटवर बंदी आणण्याविषयी विविध स्तरांवरून मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत सूचना दिल्या आहेत.
राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही ई-सिगारेट विकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. देशभरात ‘ई-सिगारेटी’ची विक्री, उत्पादन, आयात आणि व्यापारावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तरीही मुंबईसह अनेक भागांत छुप्या पद्धतीने ई-सिगारेट आणि हुक्का पार्लरचा व्यवसाय केला जातो. त्यामुळेच, यावर निर्बंध घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील सर्व विभागीय औषध अधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवून ‘ई-सिगारेट’ विक्री होत असल्याचे आढळून आल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या सिगारेटमध्ये निकोटीनचा वापर केल्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कर्नाटक, जम्मू-काश्मीर, केरळ आणि हरियाणा या राज्यांनी याआधीच ई-सिगारेटवर बंदी घातली आहे.
>चौकशीअंती कार्यवाहीचे निर्देश
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, ई-सिगारेटमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळेच केंद्र आणि आरोग्य विभागाने ई-सिगारेटवर बंदी आणली आहे. त्यानुसार आता राज्य शासनाच्या सहकार्याने कारवाईसाठी कठोर पावले उचलली जातील. राज्याच्या सर्व विभागीय सह-आयुक्त (औषध), साहाय्यक आयुक्त आणि औषध निरीक्षकांना यासंदर्भात पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात बेकायदा ई-सिगारेटची विक्री सुरू असल्याचे आढळून आल्यास त्याची सखोल चौकशी करून पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Action on e-cigarette, hookah sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.