दिघ्यातील ‘त्या’ बांधकामांवर कारवाई

By admin | Published: November 30, 2015 11:21 PM2015-11-30T23:21:28+5:302015-11-30T23:21:28+5:30

दिघा परिसरातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात एमआयडीसीने सुरू केलेल्या कारवाईला न्यायालयाने दिलेली स्थगितीची मुदत सोमवार ३0 नोव्हेंबर रोजी संपली. त्यामुळे उर्वरित

Action on 'that' construction of the hill | दिघ्यातील ‘त्या’ बांधकामांवर कारवाई

दिघ्यातील ‘त्या’ बांधकामांवर कारवाई

Next

नवी मुंबई : दिघा परिसरातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात एमआयडीसीने सुरू केलेल्या कारवाईला न्यायालयाने दिलेली स्थगितीची मुदत सोमवार ३0 नोव्हेंबर रोजी संपली. त्यामुळे उर्वरित बांधकामांवर कारवाईसाठी एमआयडीसीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार ७ डिसेंबरपासून या बांधकामांवर पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
दिघ्यातील ९९ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ९९ पैकी ९५ बांधकामे एमआयडीसीच्या तर ७ बांधकामे सिडकोच्या जमिनीवर उभारण्यात आली आहे. त्यानुसार एमआयडीसीने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ९ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. आणखी ८३ बांधकामांवर कारवाई करायची आहे. परंतु सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने उर्वरित इमारतींवरील कारवाईला ३0 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. स्थगितीची ही मुदत सोमवारी संपल्याने एमआयडीसीने पुन्हा एकदा कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु पोलीस बंदोबस्त व इतर कारणांमुळे आठवडाभर कारवाई करणे शक्य नसल्याने ७ डिसेंबरपासून धडक मोहीम उघडण्याचा निर्णय एमआयडीसीने दिला आहे.
(प्रतिनिधी)

सिडकोही आक्रमक
दिघ्यातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आता सिडकोनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. ९९ पैकी ७ बांधकामे सिडकोच्या जागेवर आहेत. त्यामुळे ही बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे. परंतु यापैकी चार बांधकामांवर न्यायालयीन स्थगीती असल्याने कारवाईला अडथळा निर्माण झाला आहे. असे असले तरी १ जानेवारीपासून या इमारतींवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे प्रमुख योगेश म्हसे यांनी दिली आहे.

Web Title: Action on 'that' construction of the hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.