सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी न मिळाल्यानं ‘एबीई’च्या शिक्षकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 02:57 AM2017-10-24T02:57:14+5:302017-10-24T02:57:17+5:30

मुंबई : गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही आर्कडीओसान शिक्षण मंडळातील (एबीई) शाळेच्या शिक्षकांना थकबाकी मिळालेली नाही.

The Abe's teachers' agitation did not get the sixth pay commission's due | सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी न मिळाल्यानं ‘एबीई’च्या शिक्षकांचे आंदोलन

सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी न मिळाल्यानं ‘एबीई’च्या शिक्षकांचे आंदोलन

Next

मुंबई : गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही आर्कडीओसान शिक्षण मंडळातील (एबीई) शाळेच्या शिक्षकांना थकबाकी मिळालेली नाही. प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी न मिळाल्याने शिक्षण मंडळाच्या शिक्षकांनी एकत्र येऊन आंदोलन केले.
शिक्षण मंडळाच्या विविध शाळांमधील १५० शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वांकडे आनंद, उत्साहाचे वातावरण होते. पण, या प्राथमिक शिक्षकांना थकबाकी न मिळाल्याने त्यांनी शांततेत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. शिक्षण मंडळासह शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले. पण, तरीही हा प्रश्न सुटलेला नाही.
सहावा वेतन आयोग लागू झाल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण, २००५पासूनची थकबाकी मिळवण्यासाठी शिक्षकांनी अनेकदा पाठपुरावा केला. पण, काम झाले नाही. प्रत्येकवेळी शिक्षकांच्या पदरी निराशाच
आली. हा प्रश्न सुटावा म्हणून शिक्षण मंडळाशी संपर्क साधला. शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. पण, कोणाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. म्हणून शांततेत मोर्चा काढण्याचा मार्ग स्वीकारल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले.

Web Title: The Abe's teachers' agitation did not get the sixth pay commission's due

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.