विजेच्या तारांमुळे लागली २१ मजली इमारतीला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 09:51 AM2023-11-28T09:51:07+5:302023-11-28T09:51:29+5:30

जीवितहानी नाही, विद्युत यंत्रणा जळाली.

a 21storey building caught fire due to electrical wires | विजेच्या तारांमुळे लागली २१ मजली इमारतीला आग

विजेच्या तारांमुळे लागली २१ मजली इमारतीला आग

मुंबई :मुंबई सेंट्रल येथील आग्रीपाडा पोलिस स्थानकानजीक असलेल्या एकवीस मजली इमारतीला सोमवारी सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.


सोमवारी सकाळी इमारतीला आग लागताच धुराचे लोट इमारतीत पसरू लागले. ही बाब लक्षात येताच रहिवाशांनी आरडाओरडा सुरू केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. विजेच्या तारा आगीच्या संपर्कात आल्यामुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे इमारतीतील विद्युत यंत्रणा, विद्युत तारा आगीत जळून खाक झाल्या. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. 

अग्निशामकांनी इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना शिड्यांच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सकाळी दहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले.

Web Title: a 21storey building caught fire due to electrical wires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.