म्हाडाच्या लॉटरीसाठी ७५ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:25 AM2018-11-29T06:25:18+5:302018-11-29T06:25:27+5:30

कोकण मंडळाच्या लॉटरीच्या तुलनेत मुंबई मंडळाला आॅनलाइन लॉटरीत ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.

75 thousand applications for MHADA lottery | म्हाडाच्या लॉटरीसाठी ७५ हजार अर्ज

म्हाडाच्या लॉटरीसाठी ७५ हजार अर्ज

Next

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांच्या लॉटरीसाठी बुधवारी रात्री नऊवाजेपर्यंत ७५ हजार १४० अर्ज दाखल झाले.

७२ हजार ६६० अर्जदारांनी या लॉटरीसाठी आॅनलाइन नोंदणी पूर्ण केली आहे. संकेतस्थळ वापरणाऱ्यांची संख्या १ लाख, २८ हजारांच्या आसपास असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले. कोकण मंडळाच्या लॉटरीच्या तुलनेत मुंबई मंडळाला आॅनलाइन लॉटरीत ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.

Web Title: 75 thousand applications for MHADA lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा