पश्चिम रेल्वेने केली ७१८ मुलांची घरवापसी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:58 AM2019-05-22T05:58:06+5:302019-05-22T05:58:10+5:30

सुखरूप पालकांच्या स्वाधीन : मुंबई सेंट्रल विभागातून सर्वाधिक ३८१ बालकांची सुटका

718 children return home by Western Railway! | पश्चिम रेल्वेने केली ७१८ मुलांची घरवापसी!

पश्चिम रेल्वेने केली ७१८ मुलांची घरवापसी!

Next

मुंबई : बऱ्याचवेळा लहान मुले रागाने किंवा अन्य कारणाने घर सोडतात. परंतु, राग मावळल्यानंतर त्यांना आपल्या कुटुंबाशी संपर्क करणे शक्य होत नाही. अशा मुलांचा काही समाजकंटक गैरफायदा घेतात. पश्चिम रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)ने राज्य पोलीस, गुप्तहेर संस्था, स्वयंसेवी संघटना यांच्या समन्वयाने मार्च २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान घरापासून दुरावलेल्या ७१८ मुलांची घरवापसी केली आहे.


तर १ एप्रिल ते २० मे दरम्यान ६६ मुलांची सुटका करण्यात आली आहे. यात पश्चिम रेल्वे चाइल्ड हेल्पलाइनने महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर म्हणाले, बेवारस मुले तस्करीला बळी पडतात. शिवाय बरीच मुले रेल्वे स्थानकावर भटकताना आढळतात. यंदा पश्चिम रेल्वेने ७१८ मुलांची सुटका केली आहे.


त्यामध्ये मुंबई सेंट्रल विभागातून ३८१, बडोदा ७१, अहमदाबाद ४४, रतलाम १७४, राजकोट २३ आणि भावनगर विभागातून २५ मुलांची सुटका केली आहे.

चाइल्ड हेल्पलाइन डेस्कची स्थापना
च्जेव्हा एखादा मुलगा संकटात असल्याचे आढळते, तेव्हा त्याच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच तो चुकीच्या व्यक्तीकडे जाणार नाही याची काळजी घेतली जाते. हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
च्या मुलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेद्वारा महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या मदतीने उपाययोजना करण्यात येत आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, सुरत, बडोदा, अहमदाबाद, रतलाम आणि राजकोट स्थानकांवर चाइल्ड हेल्पलाइन डेस्कची स्थापना करण्यात आली आहे.
च्घर सोडून आलेल्या मुलांची सुटका करून त्यांना त्यांचे आई-वडील, पोलीस किंवा स्वयंसेवी संस्थांकडे सोपविले जाते.
जेव्हा एखादा मुलगा संकटात असल्याचे आढळते, तेव्हा त्याच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच तो चुकीच्या व्यक्तीकडे जाणार नाही याची काळजी घेतली जाते. हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
च्या मुलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेद्वारा महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या मदतीने उपाययोजना करण्यात येत आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, सुरत, बडोदा, अहमदाबाद, रतलाम आणि राजकोट स्थानकांवर चाइल्ड हेल्पलाइन डेस्कची स्थापना करण्यात आली आहे.
च्घर सोडून आलेल्या मुलांची सुटका करून त्यांना त्यांचे आई-वडील, पोलीस किंवा स्वयंसेवी संस्थांकडे सोपविले जाते.

Web Title: 718 children return home by Western Railway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.