७ महिन्यांच्या बाळाने गिळला एलईडी बल्ब, डॉक्टरांनी दोन मिनिटांत काढला बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 06:17 PM2018-01-24T18:17:02+5:302018-01-24T18:17:47+5:30

चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्याच्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. आठवड्याभराने अरिबाला बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी कुठलाही वेळ न दवडता तपासणी करून ब्लाँन्कोस्कोपीने अगदी २ मिनिटांत हा बल्ब बाहेर काढण्यात यश आलं. 

The 7-month-old baby swallowed the LED bulb, the doctor pulled out in two minutes | ७ महिन्यांच्या बाळाने गिळला एलईडी बल्ब, डॉक्टरांनी दोन मिनिटांत काढला बाहेर

७ महिन्यांच्या बाळाने गिळला एलईडी बल्ब, डॉक्टरांनी दोन मिनिटांत काढला बाहेर

Next

 मुंबई - चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्याच्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. पालकांना वाटले की तिने, दोरा किंवा मोबाईलची पिन गळली असावी. त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप येऊ लागला. त्यामुळे पालक तिला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. तिच्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये बाह्यघटक असल्याचे तिच्या एक्स-रेमध्ये आढळन आले. त्यानंतर आठवड्याभराने त्यांनी अरिबाला बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी कुठलाही वेळ न दवडता तपासणी करून ब्लाँन्कोस्कोपीने अगदी २ मिनिटांत हा बल्ब बाहेर काढण्यात यश आलं. 
बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलमधील ईएनटी (कान-नाक-खसा) विभागाचे प्रमुख डॉ. दिव्या प्रभावत म्हणतात, "प्रतिजैविके देण्यात आली आणि जेव्हा ब्रॉन्कोस्कोपी केली गेली तेव्हा तो बाह्यघटक बरेच दिवस तिथे राहिल्याने संपूर्ण फुफ्फुसामध्ये कणिका उती (उतीचे कण) आढळून आली. हा संसर्ग काढून घालवून टाकण्यासाठी इंट्राव्हेनस (थेट नसेमधून) प्रतिजैविके आणि स्टेरॉइड्स देण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा ब्रॉन्कोस्कोपी केली आणि दोन मिनिटांत हा बाह्यघटक (स्कोपमधून केवळ एक वायर दिसत होती) फोरसेप्सचा वापर करून काढण्यात आला. आश्चर्य म्हणजे तो २ सेंटिमीटरचा एलईडी बल्ब होता. इथे हजारच्या वर स्कोपी झाल्या आहेत, परंतु, त्यात असे कधीही आढळून आलेले नाही."

अरिबाचे वडील म्हणतात, "माझ्या मुलीचा जीव वाचवल्याबद्दल मी वाडिया हॉस्पिटलमधील टीमचा अत्यंत आभारी आहे. आमच्या मुलीने एलईडी बल्ब गिळला असेल, हे आम्हाला अजिबात माहीत नव्हते. पण इथल्या डॉक्टरांनी अचूक निदान केले आणि तत्काळ उपचार केले."  हॉस्पिटलमध्ये देशातील सर्वाधिक पेडिअ‍ॅट्रिक ब्रॉन्कोस्कोपी केल्या आहेत आणि अनेक मोठ्या हॉस्पिटलमधून या ठिकाणी तृतीयक शिफारसी (टर्शरी रेफरल) करण्यात आल्या आहेत.", अशी पुष्टी डॉ. मिनी बोधनवाला यांनी जोडली.

Web Title: The 7-month-old baby swallowed the LED bulb, the doctor pulled out in two minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.