प्राण्यांपासून होतात ६१ % संसर्गजन्य आजार; संयुक्त संशोधनाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 03:28 AM2019-04-27T03:28:34+5:302019-04-27T03:28:46+5:30

पर्यटनामुळे प्रसार तीव्र : मनुष्य-प्राणी आजारांचे संयुक्त संशोधन आवश्यक

61% of infectious diseases occur in animals; Need for joint research | प्राण्यांपासून होतात ६१ % संसर्गजन्य आजार; संयुक्त संशोधनाची गरज

प्राण्यांपासून होतात ६१ % संसर्गजन्य आजार; संयुक्त संशोधनाची गरज

Next

- निशांत वानखेडे 

नागपूर : रेबीज, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू, सार्स, अ‍ॅन्थे्रक्स हे आजार जीवघेणे ठरत आहेत. यातील बहुतेक आजार हे प्राण्यांच्या संसर्गामुळे माणसांमध्ये संक्रमित होत आहेत. या आजारांचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर मनुष्य आणि प्राण्यांच्या आजाराबाबत संयुक्तपणे संशोधन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर यांनी मांडलेले विवेचन या दृष्टीने विचार करायला लावणारे आहे. श्वानांपासून होणाऱ्या रेबीजमुळे दरवर्षी जगात ५० हजार नागरिकांचा मृत्यू होतो. त्यातले वीस हजार मृत्यू केवळ भारतात होतात. पशुजन्य संसर्गामुळे होणारा ब्रुसोलिसीस हा आजार स्त्रियांमध्ये गर्भपाताचे कारण ठरू शकतो. मागील वर्षी जनावरांना चिकटणाºया गोचिडामुळे होणाºया स्क्रब टायफस आजाराने महाराष्टÑासह देशात सर्वाधिक बळी घेतले. गेल्या काही वर्षांत स्वाइन फ्लू आणि बर्ड फ्लू हे मानवी मृत्यूचे कारण ठरले आहेत.

नागपूरच्या क्षेत्रात उद्योग व पर्यटनाची सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जगभरातील प्रवाशांची संख्या वाढत असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे नॅशनल झुनोसिस इन्स्टिट्यूटप्रमाणे राष्टÑ वन हेल्थ संस्था नागपुरात होणे गरजेचे आहे. तसा प्रस्तावही तयार आहे.
- डॉ. अजय पोहरकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद

Web Title: 61% of infectious diseases occur in animals; Need for joint research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.