स्थलांतरित चार हजार पक्ष्यांपैकी ५७ पक्षी मायदेशी परतलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 02:23 AM2019-05-29T02:23:47+5:302019-05-29T02:23:50+5:30

‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) ने पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या उद्देशाने गेल्या दहा महिन्यांमध्ये मुंबईतील चार हजार स्थलांतरित पक्ष्यांना रिंग आणि कलर टॅग केले आहे.

57 migratory birds from migratory birds did not return home | स्थलांतरित चार हजार पक्ष्यांपैकी ५७ पक्षी मायदेशी परतलेच नाहीत

स्थलांतरित चार हजार पक्ष्यांपैकी ५७ पक्षी मायदेशी परतलेच नाहीत

googlenewsNext

मुंबई : ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) ने पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या उद्देशाने गेल्या दहा महिन्यांमध्ये मुंबईतील चार हजार स्थलांतरित पक्ष्यांना रिंग आणि कलर टॅग केले आहे. तसेच बीएनएचएसचे विद्यार्थी असलेल्या वेदांत कसंबे याने रिंग आणि कलर टॅग केलेल्या ५७ पक्ष्यांना एकाच दिवशी कॅमेऱ्यात टिपले आहे. त्याच्या या निरीक्षणामुळे पक्षी स्थलांतरणाच्या अभ्यासाला मदत होणार आहे. याशिवाय पक्षी स्थलांतराची माहिती संकलित करण्यासाठी बीएनएचएस कडून एक ‘मोबाइल अ‍ॅप’ प्रसिद्ध केला जाणार आहे.
पक्ष्यांना रिंग (अर्थात अल्युमिनियमचे कडे वा वाळा) कलर टॅग आणि नेक कॉलर लावण्याचे काम प्रामुख्याने संस्थेच्या तामिळनाडूमधील पॉईंट कॅलिमर आणि ओडिसातील चिलिका तलाव येथील केंद्रांमध्ये होते. मात्र यंदा पहिल्यांदाच मुंबईतील स्थलांतरित पक्ष्यांना रिंग आणि कलर टॅग लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत ३९०६ चिखलपायटे आणि ३९ रोहित (फेल्मिंगो) पक्ष्यांना कलर टॅग आणि रिंग करण्यात आले आहे. हा उपक्रम आॅगस्ट २०१८ ते मे २०१९ या कालवधीत पूर्ण झाला. केवळ पाच तासांमध्ये कलर टॅग आणि रिंग केलेल्या ५७ पक्ष्यांना टिपले आहे. ११ मे रोजी नवी मुंबईतील टी एस चाणक्य येथे पक्षी निरीक्षणासाठी गेल्यावर पक्ष्यांची एक हजार छायाचित्रे कॅमेºयात कैद झाली.
छोट्या चिखल्या, सामान्य टिलवा, बाकचोच तुतारी अशा ५७ पक्ष्यांना कलर टॅग आणि रिंग केल्याचे आढळल्याने त्याची माहिती बीएनएचएसला देण्यात आली. स्थलांतरित पक्ष्यांना बीएनएचएसने पकडून त्यांच्यावर कलर टॅग आणि रिंग केले होते. जे आता काही पक्षी कॅमेºयात टिपले आहेत. त्यातील बरेचसे पक्षी इथून स्थलांतरित झालेले नाहीत. तसेच दुसºया देशात या पक्ष्यांचे फोटो काढले गेले. तर आपल्या इथून हा पक्षी तिकडे स्थलांतरित झाला आहे, हे सिद्ध होईल. अशा प्रकारे पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास केला
जाऊ शकतो, अशी माहिती बीएनएचएसचे विद्यार्थी वेदांत कसंबे यांनी दिली.
>पक्षी स्थलांतराच्या शास्त्रीय अभ्यासामुळे ‘सेंट्रल एशियन फ्लायवे’ अर्थात पक्षी स्थलांतर मार्गाच्या अंतर्गत येणाºया नवी मुंबई आणि उरणमधील पाणजे, एनआरआय, टीएस चाणक्य, बेलपाडा, भेंडखळ आणि भांडुप उद्दचन केंद्र या पाणथळीच्या जागांना महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच पाणथळ जागांच्या संरक्षणार्थ काही धोरणांची निर्मिती करताना पक्षी स्थलांतराच्या शास्त्रीय नोंदी महत्त्वाची भूमिका बजावतात.
- डॉ. दीपक आपटे, संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी
>पहिल्यांदाच उपक्रम
यंदा पहिल्यांदाच मुंबईतील स्थलांतरित पक्ष्यांना रिंग आणि कलर टॅग लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत ३९०६ चिखलपायटे आणि ३९ रोहित पक्ष्यांना कलर टॅग, रिंग करण्यात आले ़

Web Title: 57 migratory birds from migratory birds did not return home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.