मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात ३६ इमारतींना ओसी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:45 AM2017-12-08T01:45:02+5:302017-12-08T01:45:08+5:30

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील ६१पैकी ३६ इमारतींना ओसी नसल्याची माहिती समोर आली आहे. या इमारती १९७५पासून २००८दरम्यान बांधण्यात आल्या आहेत.

 36 buildings are not vacant in the Kalina area of ​​Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात ३६ इमारतींना ओसी नाही

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात ३६ इमारतींना ओसी नाही

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील ६१पैकी ३६ इमारतींना ओसी नसल्याची माहिती समोर आली आहे. या इमारती १९७५पासून २००८दरम्यान बांधण्यात आल्या आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेकडे कलिना परिसरातील इमारतींस दिलेल्या सीसी, आयओडी, ओसीची माहिती मागितली होती. त्यानुसार उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) विशेष कक्षाने त्यांना दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ पूर्व, कोले-कल्याण व्हिलेज, सीटीएस नंबर ४०९४ येथे विद्यापीठाने बांधलेल्या अधिकांश इमारतींना ओसी नाही. ६१पैकी फक्त २४ इमारतींना ओसी मिळाली असून, ३६ इमारतींना अद्याप ओसी मिळाली नाही. कल्चरल सेंटर या इमारतीला पार्ट ओसी आहे.

यांना ओसी
रानडे भवन, टिळक भवन, वर्कशॉप, डब्ल्यूआरआयसी गेस्ट हाउस, एसपी लेडिज हॉस्टेल, न्यू क्लास क्वॉर्ट्स, महात्मा फुले भवन, ज्ञानेश्वर भवन, यूरसिसन अभ्यास स्टाफ क्वॉर्ट्स ए, बी, सी, डी, ई, एफ, सीडी देशमुख भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, प्रेस गोडाउन, अबुल कलाम बिल्डिंग, फिरोजशहा मेहता भवन, अण्णा भाऊ साठे भवन, पक्षी भवन, ग्लास भवन, कुलगुरू बंगला

ओसीची प्रतीक्षा
आयसीएसएसआर हॉस्टेल, रीडरर्स क्वार्ट्स १२ अ, १२ बी, १२ सी, विद्यार्थी कॅन्टीन, ओल्ड लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, जेएन लायब्ररी, जेपी नाईक भवन, डब्ल्यूआरआयसी प्रशासकीय इमारत, आरोग्य केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील बॉईज हॉस्टेल, एमडीके लेडिज हॉस्टेल, गरवारे इन्स्टिट्यूट ओल्ड, न्यू गरवारे इन्स्टिट्यूट, वर्कशॉप गरवारे, स्टाफ क्वॉर्ट्स जी, पंडिता रमाबाई लेडिज हॉस्टेल, अलकेश दिनेश मोदी गॅलरी, मराठी भवन, आयडॉल इमारत, झंडू इन्स्टिट्यूट, अनेक्स बिल्डिंग, लाइफ सायन्स बिल्डिंग, एक्साम कॅन्टिन, शिक्षक भवन, पोस्ट आॅफिस, सर्व्हंट क्वॉर्ट्स, न्यू लेक्चर कॉम्प्लेक्स, संस्कृत भवन, भाषा भवन, राजीव गांधी सेंटर, आयटी पार्क, शंकरराव चव्हाण टीचर्स ट्रेनिंग अकादमी, यूएमडीएई हॉस्टेल, यूएमडीएई फॅकल्टी बिल्डिंग, नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्निकल सेंटर

Web Title:  36 buildings are not vacant in the Kalina area of ​​Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.