आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३,५०० वाहने तयार; प्रशासनाची जोरदार तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:42 AM2024-04-01T10:42:11+5:302024-04-01T10:43:25+5:30

आतापासूनच लोकसभा निवडणुकीसाची जोरदार तयारी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात सुरू झाली आहे.

3500 vehicles ready for upcoming lok sabha elections and 57 thousand manpower will be working for election duty | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३,५०० वाहने तयार; प्रशासनाची जोरदार तयारी सुरू

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३,५०० वाहने तयार; प्रशासनाची जोरदार तयारी सुरू

मुंबई :मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. असे असले, तरी आतापासूनच या निवडणुकीची जोरदार तयारी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यासाठी ५७ हजार मनुष्यबळ कार्यरत असणार आहे. त्यांच्यासाठी जवळपास साडेतीन हजार वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

निवडणुकीसाठी मुंबई उपनगरात जवळपास दोन हजार वाहने, तर मुंबई शहर जिल्ह्यात दीड हजार वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

१) निवडणुकीच्या शासकीय कामकाजासाठी मोठ्या संख्येने वाहनांची आवश्यकता असते. 

२) निश्चित केलेली वाहने सज्ज ठेवण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत.

३) निवडणूक कामकाजासाठी बऱ्याच वाहनांची आवश्यक लागणार आहे. जशी जशी आवश्यकता लागेल, तशी वाहने निश्चित करण्यात येत आहेत.- तेजस समेळ, उपनिवडणूक अधिकारी, उपनगर जिल्हा

इतर वाहने : २२८०

कोणती वाहने    किती?

मिनी बस           ४०

बस                   १२०

टेम्पो                 ५००

चारचाकी           ६०० 

Web Title: 3500 vehicles ready for upcoming lok sabha elections and 57 thousand manpower will be working for election duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.