तलावांमध्ये ३४८ दिवसांचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 05:12 AM2017-08-16T05:12:12+5:302017-08-16T05:12:15+5:30

श्रावण सरी बरसल्यानंतर मोठी विश्रांती घेणा-या पावसाने तलाव क्षेत्रात पुन्हा जोर धरला आहे.

348 days of stock in ponds | तलावांमध्ये ३४८ दिवसांचा साठा

तलावांमध्ये ३४८ दिवसांचा साठा

googlenewsNext

मुंबई : श्रावण सरी बरसल्यानंतर मोठी विश्रांती घेणा-या पावसाने तलाव क्षेत्रात पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये तलावांच्या जलसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. परिणामी, वर्षभर मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी आणखी केवळ १७ दिवसांचा जलसाठा वाढण्याची आवश्यकता आहे.
या वर्षी जुलै महिना गाजवणाºया पावसाने तिसºया आठवड्यातच तलाव भरले. मोडक सागर, तानसा, भातसा असे प्रमुख तलाव भरून वाहू लागले. मात्र आॅगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. गेले काही दिवस कोरडेच गेले, यामुळे तलावांमधील जलसाठा कमी होऊ लागला होता. मात्र गेले दोन दिवस पावसाने पुन्हा जोरदार एण्ट्री मारली आहे. त्यामुळे तुळशी तलाव सोमवारी सकाळी भरून वाहू लागला. त्यापाठोपाठ आता मध्य वैतरणा तलावही लवकरच भरून वाहण्याच्या मार्गावर आहे. तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी अद्याप दीड लाख दशलक्ष लीटर जलसाठा वाढणे आवश्यक आहे.
मुंबईला वर्षभर चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अवाश्यक आहे. मुसळधार पावसामुळे सर्व प्रमुख तलावांमध्ये एकूण १३ लाख ५ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेला मुंबई शहर आणि उपनगरातील पाणीचोरी आणि गळतीवर उपाय सापडलेला नाही. परिणामी दररोज लाखो लीटर पाणी वाया जात असून, पाणी चोरीचे प्रमाण पूर्व उपनगरात अधिक आहे. महापालिकेने जर पाणीचोरी आणि गळतीवर उपाय शोधला तर महापालिकेचे किती तरी लीटर पाणी वाचेल, असे जलअभ्यासक सीताराम शेलार यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे याप्रश्नी कित्येक वेळा आवाज उठविण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी महापालिका गंभीर नसल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे.
>शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठ्यात तुलनेने फरक आहे. हा फरक समसमान करावा
आणि मागेल त्याला पाणी देण्यात यावे, असे जल अभ्यासकांचे म्हणणे
आहे.मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो.
मुंबईत पाण्याची मागणी दररोज ४२०० दशलक्ष लीटर्स एवढी आहे.
दररोज २५ ते ३० टक्के म्हणजे सुमारे नऊशे दशलक्ष लीटर्स पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे.
>जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये (मि.मी.)
तलाव कमाल किमान आजची स्थिती
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १६२.४४
तानसा १२८.६३ ११८.८७ १२८.५६
विहार ८०.१२ ७३.९२ ७८.६५
तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.३०
अपर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ६०२.३२
भातसा १४२.०७ १०४.९० १३८.८९
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २८४.३४
>असा आहे जलसाठा (आकडेवारी दशलक्ष लीटरमध्ये)
२०१७ -
१३ लाख ५ हजार
२०१६ -
१२ लाख ९६ हजार
२०१५
९ लाख ८ हजार

Web Title: 348 days of stock in ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.