भायखळ्यातून बेकायदेशीर ३४ सिलिंडर जप्त, महापालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 02:58 AM2017-12-24T02:58:05+5:302017-12-24T02:58:14+5:30

महापालिकेच्या ई विभागात २१ व २२ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान उपाहारगृहांमधील अनधिकृत सिलिंडरसाठ्यावर; तसेच रस्त्यावर अनधिकृतपणे अन्न शिजवणा-यांवर कारवाई करण्यात आली.

34 cylinders seized illegally from Bhayak, Municipal corporation proceedings | भायखळ्यातून बेकायदेशीर ३४ सिलिंडर जप्त, महापालिकेची कारवाई

भायखळ्यातून बेकायदेशीर ३४ सिलिंडर जप्त, महापालिकेची कारवाई

Next

मुंबई : महापालिकेच्या ई विभागात २१ व २२ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान उपाहारगृहांमधील अनधिकृत सिलिंडरसाठ्यावर; तसेच रस्त्यावर अनधिकृतपणे अन्न शिजवणा-यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान उपाहारगृहांमधून २४ सिलिंडर, तर रस्त्यावर अनधिकृतपणे अन्न शिजवणा-यांकडून १० सिलिंडर याप्रमाणे एकूण ३४ सिलिंडर जप्त करण्यात आले. तसेच एका अनधिकृत हुक्का पार्लरमधील सर्व सामान जप्त करून ते बंद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त १८ शेड्स, १० वाढीव बांधकामे, २ गॅरेज यावर निष्कासन कारवाई करून ८ पडीक वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती ई विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी दिली.
परिमंडळ १चे उपायुक्त सुहास करवंदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली ही कारवाई महापालिकेच्या ई विभागातील आग्रीपाडा, जे.जे. मार्ग, टँक पाखाडी मार्ग, के. के. मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, रामशेठ नाईक मार्ग, म्हातारपाखाडी मार्ग, पीरखान स्ट्रीट या परिसरात करण्यात आली आहे. या निष्कासनाच्या कारवाईमुळे पदपथ व रस्ते मोकळे होण्यासोबतच अनधिकृत सिलिंडरचे साठे जप्त करण्यात आल्याने अग्निसुरक्षेच्या अंमलबजावणीला अधिक सकारात्मकता लाभली आहे.
या कारवाईदरम्यान अनधिकृतपणेच चालणा-या एका हुक्का पार्लरमधील ३० खुर्च्या, ३ टेबल यांसह सर्व साहित्य जप्त करण्यात येऊन सदर हुक्का पार्लर बंद करण्यात आले आहे.
यापूर्वी याच ई विभाग परिसरात २० डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान २८ सिलिंडर जप्त करण्यात आले होते. तसेच २५ अनधिकृत बांधकामांसह ४ दुकानांवर कारवाई करण्यात आली होती.

पदपथ मोकळे : या कारवाईमुळे पदपथ व रस्ते मोकळे होण्यासोबतच अग्निसुरक्षेच्या अंमलबजावणीला अधिक सकारात्मकता लाभली आहे.

Web Title: 34 cylinders seized illegally from Bhayak, Municipal corporation proceedings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई