‘सीएसएमटी’ला ३०० सीसीटीव्हींचे कवच, मॉनिटरिंग करण्यासाठी स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:13 AM2017-11-26T00:13:58+5:302017-11-26T00:14:16+5:30

नऊ वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर मध्य रेल्वेचे मुख्यालय अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा बलाने संवेदनशील असलेल्या सीएसएमटीच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पावले उचलली.

300 cct of shell for CSMT, independent cell for monitoring | ‘सीएसएमटी’ला ३०० सीसीटीव्हींचे कवच, मॉनिटरिंग करण्यासाठी स्वतंत्र कक्ष

‘सीएसएमटी’ला ३०० सीसीटीव्हींचे कवच, मॉनिटरिंग करण्यासाठी स्वतंत्र कक्ष

Next

- महेश चेमटे

नऊ वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर मध्य रेल्वेचे मुख्यालय अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा बलाने संवेदनशील असलेल्या सीएसएमटीच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पावले उचलली. सद्य:स्थितीत सीएसएमटी येथे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याचे मॉनिटरिंग करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहे. मात्र नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ मनुष्यबळाच्या विवंचनेत असल्याचे दिसून येत आहे.
देशी नागरिकांसह विदेशी पर्यटकांना ओलीस धरत अतिरेक्यांनी मुंबईला वेठीस धरले. २६ नोव्हेंबर २००८ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बेछूट गोळीबार करत त्यांनी मध्य रेल्वेच्या मुख्यालयात धुडगूस घातला. सुमारे ४८ तासांहून जास्त काळ हा थरार सुरू होता. १० अतिरेक्यांपैकी ९ अतिरेक्यांना ठार करत एक अतिरेकी जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले. मात्र, हल्ल्यानंतर सीएसएमटीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. २६-११ अतिरेकी हल्ल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वेगाने पावले उचलली.
रेल्वेच्या या मुख्यालयातून सुमारे ८ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. यात मध्य, हार्बर प्रवाशांसह मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांचादेखील समावेश आहे. त्याचबरोबर विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने सीएसएमटीला भेट देतात. सर्वांवर नजर ठेवता यावी यासाठी मुंबई विभागात एकूण २९१४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. त्यापैकी ३०० सीसीटीव्ही कॅमेरे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे कार्यान्वित आहेत. या सीसीटीव्ही कॅमेºयाचे मॉनिटरिंग करण्यासाठी सीएसएमटी येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या अ‍ॅनेक्स इमारतीत स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. सीएसएमटीवरील आत येणाºया आणि बाहेर जाणाºया मार्गावर मेटल डिटेक्टर उभारण्यात आले आहेत. मुंबई विभागात एकूण ८५ मेटल डिटेक्टर आहेत. सीएसएमटी स्थानकात ११ एक्स-रे मशीन सुरू करण्यात आल्या आहेत. या मशीनमधून प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली जाते, अशी माहिती आरपीएफ सूत्रांनी दिली. वाढत्या प्रवाशांच्या संख्येनुसार मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाला अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे मेल-एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा पुरवण्यासाठी स्थानकांतील सीसीटीव्ही मॉनिटरिंग करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यता आहे. यानुसार अतिरिक्त ६०० मनुष्यबळाची पूर्तता करावी, अशा आशयाचे पत्र लिहिले आहे.

सुरक्षेचे नियोजन
2914
सीसीटीव्ही मुंबई विभागात

300
सीसीटीव्ही सीएसएमटीवर

085
मेटल डिटेक्टर मुंबई विभागात

011
एक्स-रे मशीन सीएसएमटीवर

02
यूव्हीएसएस सीएसएमटी येथे कार्यान्वित

04
यूव्हीएसएस संवेदनशील अन्य टर्मिनससाठी प्रस्तावित

Web Title: 300 cct of shell for CSMT, independent cell for monitoring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई