‘छाबड हाउस’मध्ये मिळणार २६/११ च्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 06:03 AM2018-11-26T06:03:22+5:302018-11-26T06:03:31+5:30

स्मारक आणि प्रतिकृती तयार करणार; चेन जेकब यांची माहिती

26/11 memories will be made in 'Chhabad House' | ‘छाबड हाउस’मध्ये मिळणार २६/११ च्या आठवणींना उजाळा

‘छाबड हाउस’मध्ये मिळणार २६/११ च्या आठवणींना उजाळा

googlenewsNext

मुंबई : २६/११ दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व नागरिकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नरिमन हाऊस येथील ‘छाबड हाऊस’मध्ये स्मारक आणि प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती आॅल इंडिया ज्युईश वेल्फअर असोशिएशनचे अध्यक्ष चेन जेकब यांनी दिली.


नरिमन हाऊसला आजपासून ‘नरिमन लाईट हाऊस’ म्हणून ओळखले जाईल. अंधारातून प्रकाशाची वाट या लाईट हाऊसच्या माध्यमातून दाखविली जाणार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात येथील ज्यू धर्मियन नागरिकांना लक्ष करुन त्यांचा छळ करण्यात आला; आणि त्यांना ठार मारण्यात आले.

ताज, नरिमन हाउसच्या प्रतिकृती
इमारतीच्या छतावर शहिदांच्या नावाचे स्मारक बनविण्यात येत आहे. शिवाय नरिमन हाऊस, ताज हॉटेल, ओबेरॉय हाऊसच्या प्रतिकृती बनविण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री काय झाले होते? याचा उलगडा या माध्यमातून केला जाणार आहे. हे सर्व काम पूर्ण होण्यासाठी अजून १ वर्ष लागणार आहे. त्यानंतर हे सर्वांसाठी खुले करण्यात येईल.

Web Title: 26/11 memories will be made in 'Chhabad House'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.