मुंबई विमानतळावरून दररोज २४० विमानांची उड्डाणे होणार रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:42 AM2019-01-14T05:42:23+5:302019-01-14T05:42:49+5:30

दोन धावपट्ट्यांची दुरुस्ती : ७ फेब्रुवारी ते ३० मार्चपर्यंत २२ दिवस विमानतळ बंद

240 flights will be canceled daily from Mumbai airport! | मुंबई विमानतळावरून दररोज २४० विमानांची उड्डाणे होणार रद्द!

मुंबई विमानतळावरून दररोज २४० विमानांची उड्डाणे होणार रद्द!

Next

मुंबई : दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या ७ फेब्रुवारी ते ३० मार्च दरम्यान मंगळवार, गुरुवार व शनिवारी ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. २२ दिवस धावपट्टी बंद असल्यामुळे दररोज २४० विमाने रद्द केली जाण्याची शक्यता आहे, शिवाय अनेक विमानांच्या मार्गातही बदल करण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.


या कालावधीत आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानांचा मार्ग बदलण्यात येणार आहे. काही विमानांच्या वेळेत बदल करण्यात येईल. या काळात रद्द केल्या जाणाऱ्या विमानांच्या प्रवाशांना परतावा देण्यात येईल व ज्यांना शक्य असेल, त्यांना दुसºया विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.


७ फेब्रुवारी ते ३० मार्च दरम्यान दर आठवड्यात मंगळवार, गुरुवार व शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या सहा तास बंद राहतील. २१ मार्च रोजी गुरुवार असला, तरी होळी असल्याने विमानतळावरील धावपट्टी सुरू ठेवण्यात येईल.
मुंबई विमानतळ हे देशातील अत्यंत व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून दररोज सरासरी ९५० विमानांची वाहतूक होते. येथे दोन धावपट्ट्या असल्या, तरी त्या एकमेकांना छेदणाºया असल्याने एका वेळी एकाच धावपट्टीचा उड्डाणासाठी किंवा लँडिंगसाठी वापर केला जातो. धावपट्टी बंद असताना प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपन्यांनी अरुंद विमानांऐवजी (नॅरो बॉडी) मोठ्या विमानांचा (वाइड बॉडी) वापर करावा, त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांना त्याद्वारे प्रवास करता येईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
नॅरो बॉडी विमानांची आसन क्षमता १५६ तर वाइड बॉडी विमानांची आसन क्षमता ३०० आहे, त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी सन २०१० मध्ये धावपट्टीची दुरुस्ती करण्यात आली होती. २०१८ मध्ये आॅक्टोबर महिन्यात एका दिवसासाठी धावपट्ट्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.

तिकिटांच्या दरांत मोठी वाढ होणार

  • एअर इंडिया व इतर खासगी हवाई वाहतूक कंपन्यांतर्फे या कालावधीत असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. धावपट्टी बंद असल्याचा सर्वात जास्त फटका मुंबई ते दिल्ली ३३ विमाने, मुंबई ते गोवा १८ विमाने व मुंबई ते बेंगळुरू १६ विमानांच्या फेºयांवर होईल.
  • त्यामुळे या ठिकाणी जाणाºया विमानांच्या तिकिटांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या तिकिटांच्या दरात सुमारे ७० ते ८० टक्के वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जाणाºया विमानांच्या तिकिटांच्या दरात २५ ते ३५ टक्के वाढ होण्याची भीती आहे.
  • च्२०१८ मध्ये आॅक्टोबर महिन्यात एका दिवसासाठी धावपट्ट्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्या वेळी सुमारे ३०० विमानांवर त्याचा परिणाम झाला होता.

Web Title: 240 flights will be canceled daily from Mumbai airport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.