अग्निशमन दलाला वर्षभरात २१३ कॉल, पनवेलमध्ये १०६ ठिकाणी आगीचे कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 04:15 AM2019-01-06T04:15:44+5:302019-01-06T04:16:08+5:30

पनवेलमध्ये १०६ ठिकाणी आगीचे कॉल : झाडे पडल्याचे ३६ तर अपघात प्रसंगी ४३ कॉल

213 calls to the fire brigade during the year, 106 fireworks calls in Panvel | अग्निशमन दलाला वर्षभरात २१३ कॉल, पनवेलमध्ये १०६ ठिकाणी आगीचे कॉल

अग्निशमन दलाला वर्षभरात २१३ कॉल, पनवेलमध्ये १०६ ठिकाणी आगीचे कॉल

Next

मयूर तांबडे

पनवेल : पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाला जानेवारी ते डिसेंबर २०१८ या दरम्यान २१३ कॉल आलेले आहेत. यापैकी आगीचे १०६, झाडे पडल्याचे ३६, अपघात ४३, व्हीआयपी दौरे २८ असे कॉल आले. आगीमुळे होणारे नुकसान मोठे असते. शिवाय, आग नियंत्रणात अनेकदा कर्मचारीही जखमी होतात. या आकडेवाडीवरून पनवेलकरांत आग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत कमालीची उदासीनता असल्याचे दिसून आले आहे.

परिसरात कुठेही आग लागली, साप दिसला, पक्षी अडकला किंवा बचाव कार्य करायचे असेल, तर पहिल्यांदा अग्निशमन दलाला फोन केला जातो. आग लागल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येते. कोणत्याही देशात संरक्षणाची चौथी फळी ‘अग्निशमन सेवा’ असे मानण्यात येते. अग्निशमन सेवेचे कर्तव्य, फक्त आगीपासून जीवन आणि मालमत्ता वाचविणे आणि त्यापासूनचे दुष्परिणाम कमीत कमी करणे एवढेच नसून बंद गटारे, विहिरी, उदवहन यंत्रे किंवा इतर यंत्रसामुग्री यात अडकून पडलेल्यांची आणि इतर (प्राणी यांची सुरक्षा), अडकलेल्यांची सुटका करणे हेही आहे. अडचणींच्या प्रसंगात अग्निशमन सेवा, कर्मचाऱ्यांचे धैर्य आणि सामुग्री हाताळण्याचे प्रशिक्षण यामुळे लोकांना साहाय्य करण्याकरिता उपयोगी पडते.
पनवेल अग्निशमन दलाने घरे, इमारती, झोपड्या, कंपन्या आदी ठिकाणी लागलेल्या आगी विझवल्या आहेत. महापालिकेच्या ताब्यात दोन बंब असून, अग्निशमन अधिकारी यांच्यासह ३४ जण कार्यरत आहेत. सिडकोच्या अखात्यारित असलेले खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेल येथे तीन अग्निशमन केंद्र आहेत. तसेच तळोजा एमआयडीसीत सुध्दा अग्निशमन केंद्र आहे. या चार केंद्रातही गेल्या वर्षभरात लहान-मोठ्या दुर्घटनासंदर्भात शेकडो कॉल्स आले आहेत.

शहरातील आगीच्या प्रमुख घटना

च्पनवेल परिसरात हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थ शिजवण्याच्या ठिकाणी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली जात नाही. गॅस-सिलिंडरसारख्या ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करतानाही पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने दुर्घटना घडतात. विद्युत उपकरणे, लिफ्ट आदीची नियमित तपासणी न केल्यास अपघात घडू शकतात. संकटकाळी बाहेर पडण्यासाठी दरवाजे आणि जिने आहेत की नाही, याही बाबी तपासणे आवश्यक आहे.

तळोजातील कारखान्यात स्फोट
तळोजातील एम. एस. आर. बायोटेक न्यूट्रीशयन प्लॉट टी ३/२ या रासायनिक कंपनीत गेल्या महिन्यात झालेल्या भीषण स्फोटात रणजितकुमार सिंग (३८) या कामगाराचा मृत्यू झाला होता. दोन कामगार घातक केमिकल आणि पावडर फिल्टर करत असताना अचानक स्फोट झाला. तळोजा अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी दोन तास अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

खारघर डोंगरावर आग
खारघर डोंगरावर २७ डिसेंबर रोजी सायंकाळी समाजकंटकांनी आग लावली. सुकलेल्या गवतामुळे आग डोंगरावर पसरली. यामध्ये वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. अग्निशमन दलाची गाडी जाण्यास रस्ता नसल्यामुळे आग विझविण्यास अडथळे निर्माण होतात. गेल्या वर्षी जवळपास १५ वेळा डोंगरावर आग लावण्यात आली होती.

आगीमुळे
लग्नघर खाक
पनवेल शहरातील जासई येथील रवींद्र अनंत जगे हे परिवारासह टपाल नाका येथील इंद्रप्रस्थ सोसायटीत राहतात. त्यांची मुलगी सायली जगे हिचा लग्न सोहळा असल्याने कपडे, पत्रिका व इतर साहित्य घरातच ठेवण्यात आले होते. २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: 213 calls to the fire brigade during the year, 106 fireworks calls in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.