‘ठाकरे सरकारच्या काळात २० हजार कोटींचा घोटाळा’; सोमय्यांची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 10:17 AM2023-11-25T10:17:09+5:302023-11-25T10:17:25+5:30

या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

'20 thousand crores scam during the Thackeray government'; Petition of Somayya | ‘ठाकरे सरकारच्या काळात २० हजार कोटींचा घोटाळा’; सोमय्यांची याचिका

‘ठाकरे सरकारच्या काळात २० हजार कोटींचा घोटाळा’; सोमय्यांची याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ठाकरे सरकारच्या काळात मुंबई महापालिकेने डी. बी. रिअल्टी समूहाचे शाहिद बालवा आणि पुण्याचे विकासक अतुल चोरडिया समूहाला मुंबईतील गटारे, नाले अथवा रस्त्याच्या शेजारी राहणाऱ्या हजारो कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यामध्ये महापालिका आणि तत्कालीन राज्य सरकारने २० हजार कोटींचा घोटाळा केला, असा दावा करत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी  मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुलुंडमधील  ५० हजार लोकांच्या घरांवर अतिक्रमण करण्याचा डाव पालिकेचे प्रशासक इक्बालसिंह चहल व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केला होता, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: '20 thousand crores scam during the Thackeray government'; Petition of Somayya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.