महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:32 AM2017-12-01T05:32:30+5:302017-12-01T05:32:43+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे एकत्र येतात. यामुळे महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष लोकल फेºया चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

 12 special local trains on the occasion of Mahaparinirvana | महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल  

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल  

Next

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे एकत्र येतात. यामुळे महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष लोकल फेºया चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दादर-कुर्ला-ठाणे-कल्याण आणि कुर्ला-मानखुर्द-वाशी-पनवेल या मार्गावर ५ आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री विशेष लोकल
चालवण्यात येणार आहे. विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहे.
मध्य मार्गावर अप दिशेला दादर-ठाणे विशेष लोकल दादर येथून रात्री १.१५ वाजता सुटणार असून १.५५ वाजता ठाणे स्थानकात पोहचणार आहे. दादर-कल्याण विशेष लोकल दादर येथून रात्री २.२५ वाजता सुटणार असून कल्याण स्थानकात ३.३५ मिनिटांनी पोहचणार आहे. तर दादर-कुर्ला विशेष लोकल दादर येथून रात्री ३ वाजता सुटणार असून ३.१५ वाजता कुर्ला स्थानकात पोहचणार आहे. मध्य मार्गावर अप दिशेला कुर्ला-दादर विशेष लोकल रात्री १२ वाजुन ४५ मिनिटांनी, कल्याण-दादर विशेष लोकल रात्री १ वाजता, ठाणे-दादर विशेष लोकल रात्री २ वाजुन १० मिनिटांनी सुटणार आहे.
हार्बर मार्गावर डाउन दिशेला कुर्ला-मानखुर्द विशेष लोकल रात्री २ वाजुन ३० मिनिटांनी, कुर्ला-पनवेल विशेष लोकल पहाटे ३ वाजता, कुर्ला-वाशी विशेष लोकल पहाटे ४ वाजता सुटणार आहे.
तर अप दिशेला वाशी-कुर्ला विशेष लोकल रात्री १ वाजुन ३० मिनिटांनी,पनवेल- कुर्ला विशेष लोकल रात्री १ वाजुन ४० मिनिटांनी आणि मानखुर्द-कुर्ला विशेष लोकल पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी चालविण्यात येणार आहे. प्रवाशांनी या लोकलचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title:  12 special local trains on the occasion of Mahaparinirvana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.