मुंबईत तीन दिवस १० टक्के पाणीकपात

By admin | Published: February 1, 2015 01:38 AM2015-02-01T01:38:25+5:302015-02-01T01:38:25+5:30

गेले तीन दिवस पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांवर पुन्हा पाणीसंकट कोसळणार आहे़ तानसा पूर्व जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवार ते गुरुवार असे ५५ तास चालणार आहे़

10% watercolom in Mumbai for three days | मुंबईत तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबईत तीन दिवस १० टक्के पाणीकपात

Next

मुंबई : गेले तीन दिवस पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांवर पुन्हा पाणीसंकट कोसळणार आहे़ तानसा पूर्व जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवार ते गुरुवार असे ५५ तास चालणार आहे़ या काळात संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात तर कुर्ला विभागात पाणीपुरवठा बंद असणार आहे़ बाळकुम ते मुलुंड येथे १८०० मि़मी़ व्यासाच्या तानसा पूर्व जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दि़ ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होत आहे़ हे काम ५ फेब्रुवारी सायंकाळी ६पर्यंत पूर्ण होईल़ त्यामुळे या काळात शहर व उपनगरात १० टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे़

Web Title: 10% watercolom in Mumbai for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.