lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रवनीत गिल येस बँकेचे नवे सीईओ; शेअरमध्ये 14 टक्क्यांनी वाढ

रवनीत गिल येस बँकेचे नवे सीईओ; शेअरमध्ये 14 टक्क्यांनी वाढ

येस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) पदाची जबाबदारी रवनीत गिल सांभाळणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रवनीत गिल यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:34 PM2019-01-24T16:34:42+5:302019-01-24T16:35:36+5:30

येस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) पदाची जबाबदारी रवनीत गिल सांभाळणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रवनीत गिल यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. 

Yes Bank Names Ravneet Singh Gill As New CEO | रवनीत गिल येस बँकेचे नवे सीईओ; शेअरमध्ये 14 टक्क्यांनी वाढ

रवनीत गिल येस बँकेचे नवे सीईओ; शेअरमध्ये 14 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : येस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) पदाची जबाबदारी रवनीत गिल सांभाळणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रवनीत गिल यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. 

रवनीत गिल सध्या डॉएशे बँक इंडियाचे सीईओ आहेत. एक मार्चपर्यंत पदभार सांभाळणार आहेत. रवनीत गिल 1991 पासून डॉएशे बँकेत आहेत. त्यांना कॅपिटल मार्केट, ट्रेजरी, फायनन्स, फॉरेन एक्सचेंज, रिक्स मॅनेजमेंट आणि खासगी बँकिंगचा अनुभव आहे. दरम्यान, रवनीत गिल यांच्या नियुक्तीनंतर येस बँकेच्या शेअरमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

येस बँकेत सध्या सीईओ पदावर राणा कपूर आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये आरबीआयने येस बँकेला निर्देश दिले होते की, सध्याचे सीईओ राणा कपूर यांच्या कार्यकाळ कमी करुन 31 जानेवारी 2019 पर्यंत केला जाईल. आरबीआयने येस बँकेच्या एनपीएचे अंदाजपत्र बनविले होते. त्यामध्ये येस बँकेच्या आकडेवारीत तफावत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आरबीआयने राणा कपूर यांचा कार्यकाळ कमी करण्याचे निर्देश दिले होते.  
 

Web Title: Yes Bank Names Ravneet Singh Gill As New CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.