lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्हॉट्स अॅप वेबही झालं अपडेट

व्हॉट्स अॅप वेबही झालं अपडेट

गेल्या वर्षी लाँच झालेलं व्हॉट्स अॅप वेबही आता अपडेट झालं असून डॉक्युमेंट शेअर करण्याचा पर्याय आता समाविष्ट झाला आहे.

By admin | Published: May 13, 2016 03:49 PM2016-05-13T15:49:44+5:302016-05-13T16:02:49+5:30

गेल्या वर्षी लाँच झालेलं व्हॉट्स अॅप वेबही आता अपडेट झालं असून डॉक्युमेंट शेअर करण्याचा पर्याय आता समाविष्ट झाला आहे.

Whatsapp update also happened on the web | व्हॉट्स अॅप वेबही झालं अपडेट

व्हॉट्स अॅप वेबही झालं अपडेट

>गेल्या वर्षी लाँच झालेलं व्हॉट्स अॅप वेबही आता अपडेट झालं असून डॉक्युमेंट शेअर करण्याचा पर्याय आता समाविष्ट झाला आहे. त्यामुळे आता डेस्कटॉपवर व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी असून आता त्यांना वर्ड फाइल्स, पीडीएफ व अन्य फॉरमॅटमधल्या फाइल्स शेअर करता येणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी व्हॉट्स अॅपनं मोबाइल अॅपसाटी ही सेवा सुरू केली होती आता, ती वेबसाठीही उपलब्ध झाली आहे. उजव्या वरच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या अटॅचमेंट आयकॉनमध्ये फोटो, व्हिडीयो व कॅमेरा शॉट्सखाली हा डॉक्युमेंटचा पर्याय देण्यात आला आहे.
ही सुविधा वापरण्यासाठी व्हॉट्स अॅपचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करणं आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अॅपनं डेस्क टॉप अॅपदेखील दाखल केलं असून व्हॉट्स अॅप वेबप्रमाणेच कनेक्टेड मोबाईलचं संभाषण घडवतं. हे अॅप विंडोज 8 आणि मॅक ओएस एक्स 10.9 व त्यानंतरच्या व्हर्जनसाठी उपयुक्त आहे.
 
तुम्ही लवकरच व्हॉट्स अॅप, स्काइप किंवा व्हायबर या मोबाइल अॅप्सवरून लँडलाइन किंवा मोबाइलवर फोन करू शकणार आहात. सविस्तर बातमीसाठी इथं क्लिक करा...

Web Title: Whatsapp update also happened on the web

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.