lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्हिडीओकॉन माध्यमावर करणार बदनामीचा दावा

व्हिडीओकॉन माध्यमावर करणार बदनामीचा दावा

शेअर बाजारात दाखल केलेल्या वैधानिक माहितीमध्ये आपल्यावरील थकीत कर्जांचा दोष आपण पंतप्रधान मोदी, सर्वोच्च न्यायालय व ब्राझिलला दिला असल्याचे वस्तुस्थितीचा पार विपर्यास करणारे वृत्त दिल्याबद्दल ‘व्हिडीओकॉन इंडस्ट्रिज लि. ही कंपनी ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तमाध्यमाविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:05 AM2018-06-13T05:05:04+5:302018-06-13T05:05:04+5:30

शेअर बाजारात दाखल केलेल्या वैधानिक माहितीमध्ये आपल्यावरील थकीत कर्जांचा दोष आपण पंतप्रधान मोदी, सर्वोच्च न्यायालय व ब्राझिलला दिला असल्याचे वस्तुस्थितीचा पार विपर्यास करणारे वृत्त दिल्याबद्दल ‘व्हिडीओकॉन इंडस्ट्रिज लि. ही कंपनी ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तमाध्यमाविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करणार आहे.

Videocon will File Defamation Claims on Media | व्हिडीओकॉन माध्यमावर करणार बदनामीचा दावा

व्हिडीओकॉन माध्यमावर करणार बदनामीचा दावा

मुंबई : शेअर बाजारात दाखल केलेल्या वैधानिक माहितीमध्ये आपल्यावरील थकीत कर्जांचा दोष आपण पंतप्रधान मोदी, सर्वोच्च न्यायालय व ब्राझिलला दिला असल्याचे वस्तुस्थितीचा पार विपर्यास करणारे वृत्त दिल्याबद्दल ‘व्हिडीओकॉन इंडस्ट्रिज लि. ही कंपनी
‘ब्लूमबर्ग’ या वृत्तमाध्यमाविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करणार आहे.
‘ब्लूमबर्ग’ या आर्थिक वृत्तवाहिनीने ‘टीव्ही मेकर ब्लेम्स इंडियाज मोदी, कोर्ट अ‍ॅण्ड ब्राझिल फॉर बॅड डेट पाईल’ हे वृत्त मंगळवारी प्रसृत केले होते. त्यात नॅशनल कंपनी लॉ ट्रॅब्युनलच्या मुंबई खंडपीठावरील न्यायिक सदस्याने ६ जून रोजी दिलेल्या आदेशाचा विपर्यास करण्यात आल्याने हा दावा दाखल करण्याचे ठरविले आहे, असे व्हिडीओकॉनने एका निवेदनात म्हटले आहे. याच संदर्भात न्यायालयीन बेअदबीची कारवाई करण्याचा अधिकार कंपनीने राखून ठेवला आहे.
भारतात नोटाबंदी केल्याने पुरवठादार कच्चा माल पुरवू शकले नाहीत, असे कंपनीच्या वकिलाने न्यायालयात सांगितले होते व
त्याची तशीच नोंद न्यायालयाने केली आहे. असे असूनही या वृत्तमाध्यमाने सनसनाटी निर्माण करण्यासाठी याचा विपर्यास करून पंतप्रधान कार्यालयास निष्कारण या वादात ओढले, असे कंपनीचे म्हणणे आहे.

Web Title: Videocon will File Defamation Claims on Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.