lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोटाटंचाईवर खलबते, रिझर्व्ह बँकेत दिवसभर बैठकांचे सत्र

नोटाटंचाईवर खलबते, रिझर्व्ह बँकेत दिवसभर बैठकांचे सत्र

चलन तुटवड्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने बुधवारी अधिक विथड्रॉल झालेल्या क्षेत्रातील बँकांकडून माहिती मागविली. त्यासाठी बँकेच्या केंद्रीय कार्यालयात दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:51 AM2018-04-19T01:51:23+5:302018-04-19T01:51:23+5:30

चलन तुटवड्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने बुधवारी अधिक विथड्रॉल झालेल्या क्षेत्रातील बँकांकडून माहिती मागविली. त्यासाठी बँकेच्या केंद्रीय कार्यालयात दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते.

 Sitting on no-nozzle, meeting session throughout the day at the Reserve Bank | नोटाटंचाईवर खलबते, रिझर्व्ह बँकेत दिवसभर बैठकांचे सत्र

नोटाटंचाईवर खलबते, रिझर्व्ह बँकेत दिवसभर बैठकांचे सत्र

मुंबई : चलन तुटवड्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने बुधवारी अधिक विथड्रॉल झालेल्या क्षेत्रातील बँकांकडून माहिती मागविली. त्यासाठी बँकेच्या केंद्रीय कार्यालयात दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते.
देशभरात बँकांमध्ये पुरेशी रोख असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेने मंगळवारी केला, पण बुधवारी मात्र बँकेत चांगलीच धावपळ होती. सकाळच्या सत्रात केंद्रीय वित्त मंत्रालयाने बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केली. त्यानंतर, दुपारी बँकेतील उच्चाधिकाºयांच्या बैठका सायंकाळपर्यंत सुरू होत्या.
सूत्रांनुसार, एटीएम विथड्रॉल अधिक झालेल्या क्षेत्रातील बँकांकडून रिझर्व्ह बँकेने माहिती मागविली आहे. त्या माहितीच्या आधारे विथड्रॉल अधिक झालेल्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार
आहे, तसेच संबंधित भागात अधिक रोख पुरवठा करण्यास बँकेने सुरुवात केली आहे.

‘ई-वॉलेट’ जोरात
चलन तुटवड्यामुळे ग्राहक झपाट्याने ‘ई-वॉलेट’ वळल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे. रोख तुटवड्यात सर्वाधिक प्रभावित असलेल्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, गुजरात, आसाम, बिहार, मध्य प्रदेश व महाराष्टÑ येथील ‘ई-वॉलेट’ व्यवहारांमध्ये मागील तीन दिवसांत ३० टक्के वाढ झाल्याचा दावा, पेटीएमचे सीओओ किरण वासीरेड्डी यांनी केले.

Web Title:  Sitting on no-nozzle, meeting session throughout the day at the Reserve Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.