lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Good News - SBI ने व्याजदरात केली कपात, ८0 लाख ग्राहकांना होणार फायदा

Good News - SBI ने व्याजदरात केली कपात, ८0 लाख ग्राहकांना होणार फायदा

स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) आधार दर आणि प्रधान कर्ज दर (बीपीएलआर) ३0 आधार अंकांनी कमी केला आहे. या निर्णयाचा बँकेच्या ८0 लाख ग्राहकांना फायदा होणार आहे, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:40 AM2018-01-02T00:40:11+5:302018-01-02T10:18:39+5:30

स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) आधार दर आणि प्रधान कर्ज दर (बीपीएलआर) ३0 आधार अंकांनी कमी केला आहे. या निर्णयाचा बँकेच्या ८0 लाख ग्राहकांना फायदा होणार आहे, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

 SBI cuts interest rates | Good News - SBI ने व्याजदरात केली कपात, ८0 लाख ग्राहकांना होणार फायदा

Good News - SBI ने व्याजदरात केली कपात, ८0 लाख ग्राहकांना होणार फायदा

मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) आधार दर आणि प्रधान कर्ज दर (बीपीएलआर) ३0 आधार अंकांनी कमी केला आहे. या निर्णयाचा बँकेच्या ८0 लाख ग्राहकांना फायदा होणार आहे, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.
एसबीआयने आधार दर ८.९५ टक्क्यांवरून ८.६५ टक्के केला आहे. बीपीएलआरही १३.७0 टक्क्यांवरून १३.४0 टक्के केला. बँकेने मार्जिनल कॉस्ट आॅफ फंड बेस्ड लेंडिग रेट (एमसीएलआर) अपरिवर्तित ठेवला. एमसीएलआरमधील बदलाचा सर्व प्रकारच्या कर्जदारांवर परिणाम होतो. सध्या बँकेचा एकवर्षीय एमसीएलआर ७.९५ टक्के आहे, तो कायम राहणार आहे. बदललेले व्याजदर तत्काळ प्रभावाने सोमवारपासूनच लागू होणार आहेत. बँका आपल्या एमसीएलआरचा आढावा दर महिन्याला घेतात. आधार दराचा आढावा मात्र तीन महिन्यांतून एकदा घेतला जातो. गुप्ता यांनी सांगितले की, एमसीएलआर आणि आधार दरातील दरी वाढल्यामुळे या आधी बँकेने एमसीएलआरमध्ये कपात केली होती. गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्काची माफी बँकेने यंदाच्या मार्चअखेरपर्यंत वाढविलेली आहे. नवीन गृहकर्ज घेणारे, तसेच सध्याचे गृहकर्ज एसबीआयडे हस्तांतरित करू इच्छिणारे, यांना याचा लाभ मिळेल.

ग्राहकांना होणार मोठा लाभ

एसबीआयचे रिटेल व डिजिटल बँकिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व्याजदरांचा आढावा घेतला होता. त्यानुसार, आम्ही आमचा आधार दर ३0 आधार अंकांनी कमी करून ८.६५ टक्के केला आहे. जुना व्याजदर अदा करणारे, तसेच एमसीएलआर व्यवस्थेत स्थलांतरित न झालेले ८0 लाख ग्राहक या बदलाचे लाभधारक ठरतील.

Web Title:  SBI cuts interest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.