lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्स डिजिटलशी व्हा ‘री-कनेक्ट’

रिलायन्स डिजिटलशी व्हा ‘री-कनेक्ट’

इलेक्ट्रॉनिक्स श्रेणीतील सर्व उत्पादने सर्वोत्तम सर्व्हिस सेवेसह उपलब्ध असलेला ‘री-कनेक्ट’ हा ब्रँड ग्राहकांमध्ये वेगाने लोकप्रिय ठरत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:22 AM2018-03-19T01:22:31+5:302018-03-19T01:22:31+5:30

इलेक्ट्रॉनिक्स श्रेणीतील सर्व उत्पादने सर्वोत्तम सर्व्हिस सेवेसह उपलब्ध असलेला ‘री-कनेक्ट’ हा ब्रँड ग्राहकांमध्ये वेगाने लोकप्रिय ठरत आहे.

Reliance Digital Become 'Re-Connect' | रिलायन्स डिजिटलशी व्हा ‘री-कनेक्ट’

रिलायन्स डिजिटलशी व्हा ‘री-कनेक्ट’

मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स श्रेणीतील सर्व उत्पादने सर्वोत्तम सर्व्हिस सेवेसह उपलब्ध असलेला ‘री-कनेक्ट’ हा ब्रँड ग्राहकांमध्ये वेगाने लोकप्रिय ठरत आहे. रिलायन्स डिजिटलचा भाग असलेला हा ब्रँड वर्षभरापूर्वी लाँच झाला. या ब्रँडची उत्पादने दीड लाख कुटुंबांच्या घरात पोहोचली आहेत.
री-कनेक्टमध्ये जवळपास २०० प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे. एलईडी टीव्ही, सर्वाधिक वीजबचत करणारे एसी, वॉशिंग मशिन्स, स्मार्टफोन्स, टॅबलेट्ससह प्रत्येक घरात लागणारी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व वैयक्तिक वापराच्या उत्पादनांचा यात समावेश आहे. ग्राहकांना उपकरणांच्या खरेदीनंतर संबंधित उत्पादनाची सेवा मिळणे आवश्यक असते. यासाठीच रि-कनेक्ट ब्रँडअंतर्गत ‘रिलायन्स रेसक्यू’ हे विशेष सर्व्हिस सेंटरही देशभरात सुरू करण्यात आले आहे.
‘री-कनेक्ट’ची उत्पादनांची किंमतही बाजारापेक्षा स्वस्त व माफकआहेत. ग्राहकांना सहज वापरता येतील व त्याच वेळी त्यांना ती परवडण्याजोगी असतील, हे री-कनेक्टचे वैशिष्ट्य आहे.

Web Title: Reliance Digital Become 'Re-Connect'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.