Now plans to introduce 'Zio Coin', 'CryptoConcence' itself | आता येणार ‘जिओ कॉइन’, जाणून घ्या रिलायन्सच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ योजनेबद्दल
आता येणार ‘जिओ कॉइन’, जाणून घ्या रिलायन्सच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ योजनेबद्दल

मुंबई : रिलायन्स जिओद्वारे मोबाइल सेवा क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता ‘क्रिप्टोकरन्सी’ क्षेत्रात उडी घेण्याच्या विचारात आहे. लवकरच ‘जिओ कॉइन’ आणण्याची तयारी सुरू आहे.
‘बिटकॉइन’ या ‘क्रिप्टोकरन्सी’ने जगभरात खळबळ उडवली आहे. वर्षभरातच त्याचा भाव हजारो डॉलर्सने वाढला. याच श्रेणीत आता भारतीय कंपनीचे स्वत:चे ‘कॉइन’ येण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम अंतर्गत मुकेश अंबानी यांचे मोठे सुपुत्र आकाश अंबानी यांच्याकडे ‘जिओ कॉइन’ची सूत्रे असतील.
यासाठी ५० तरुण तज्ज्ञांची चमू काम करीत आहे. या ‘जिओ कॉइन’ अंतर्गत ब्लॉकचेन तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. हे अ‍ॅप असून त्याचा उपयोग मोबाइलमधील स्मार्ट कॉन्टॅक्ट्स व लॉजिस्टिक्स व्यवस्थापनासाठी करता येणार आहे. केंद्र सरकारने गुंतवणूकदारांना ‘क्रिप्टोकरन्सी’पासून सावध राहण्याची सूचना दिली आहे.


Web Title: Now plans to introduce 'Zio Coin', 'CryptoConcence' itself
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.